भंडाऱ्याला मिळाले नवे पोलीस अधीक्षक

    दिनांक :23-Aug-2024
Total Views |

bhandara
 
भंडारा,
Bhandara Superintendent of Police भंडाऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे मुंबई येथे स्थानांतरण झाले असून त्यांच्या ठिकाणी भंडाऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून वर्धेचे विद्यमान पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची वर्णी लागली आहे. मतानी यांची उपमानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मुंबई येथे बदली झाली आहे. वर्धेचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची मतानी यांच्या ठिकाणी भंडाऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी आणि निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बघता हसन यांच्यासाठी मोठे आव्हान राहणार आहे.