त्रिमूर्ती नगर आणि परसोडी येथे घाणीचे साम्राज्य

चिकनगुनियाला आणि डेंग्यूला आमंत्रण

    दिनांक :23-Aug-2024
Total Views |
 
 
nagar
 
नागपूर,
Trimurti Nagar Nagpur शहरात सध्या साथीचे रुग्ण भरपूर प्रमाणात वाढले आहे. ते कसे दूर करावे यासाठी प्रयत्न सुरु आहे .प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे . मात्र नागपुरात काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे .त्रिमूर्ती नगर मध्ये मटन मार्केट जवळ कायम अशी घाण असते.कधीतरी सहा महिन्यांतून एकदा तो कचरा उचलला जातो.पण परत तेव्हढीच घाण जमा होते.व दुर्गंधी देखिल पसरली आहे.त्यामुळे परीसरातील नागरिक अतिशय त्रस्त आहेत.ही समस्या म.न.पा.कायम स्वरुपी दूर करेल का?असा प्रश्न स्थानिक नागरिक सतत विचारीत आहे . 
सौजन्य :अंजली पांडे,संपर्क मित्र  
   
 परसोडी: मध्ये श्रीधर किराणा समोर भालचंद्र पडोळे यांचे घराला लागून असलेल्या रिकाम्या जागी किती तरी दिवसांपासून कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आजूबाजूच्या लोकांना तिथे  राहणे मुश्किल झाले आहे. तेथे लोक त्यांच्या घरातील कचरा गुराढोरांचे शेण सुध्दा टाकलेले दिसत आहे. गडर व सिव्हर लाईन च्या टाक्यांची छाकणे व्यवस्थित नसून काही फुटलेली पण आहेत. संपूर्ण शहर भर चिकन गुनिया, डेंग्यू असे आजार सुरू असतांनाही अशा घाणीचे साम्राज्यात नागरिकांना जीवन जगावे लागत आहे. परंतु महानगर पालिका याकडे तक्रार करुनही लक्ष द्यायला तयार नाही.नागरिकांना या त्रासापासून सुटका मिळाली पाहिजे.
 
 
 
shankar
 
 सौजन्य :शंकर पहाडे, संपर्क मित्र