बीएसएनएलचे टॉवर उभारा

23 Aug 2024 16:26:23
मानोरा, 
तालुक्यातील डोंगराच्या bsnl tower कुशीत वसलेल्या रतनवाडी या शतप्रतिशत आदिवासी वस्ती असलेल्या गावामध्ये अद्याप पर्यंत कुठलेही भ्रमणध्वनी कंपनीचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने या गावात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे टॉवर (मनोरा) उभारण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी वाशीम यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येऊन उपरोक्त मागणीची पूर्तता करण्याची विनंती केली आहे.
 
 

ddh 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील bsnl tower  कुठलाही ग्रामीण भाग मोबाईल नेटवर्क पासून वंचित राहू नये असे ध्येय ठेवलेले असताना व मागील दोन दशकांपासून देशच नव्हे तर संपूर्ण जगात मोबाईल नेटवर्क आणि मोबाईल वापरणे हे सामान्य बाब झालेली असताना रतनवाडी हे गाव कुठल्याही मोबाईल कंपनीच्या नेटवर्क कक्षेत येत नाही. नागरिक व विद्यार्थ्यांना सध्याच्या डिजिटल व आभासी युगात शासकीय योजना,शैक्षणिक योजना व इतर अनुषंगिक बाबींपासून वंचित रहावे लागत असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
सरपंच, उपसरपंच आणि ग्रापं bsnl tower सदस्यांनी जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शय तेवढ्या लवकर बीएसएनएल टॉवर रतनवाडी परिसरात उभारून नागरिकांना न्याय देण्याची मागणी केली असून, निवेदनाची दखल न घेण्यात आल्यास नाईलाजाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला आहे.
Powered By Sangraha 9.0