मुंबई,
Stree 2 Movie : अभिनेता अभिषेक बॅनर्जी त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सध्या ‘स्त्री २’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. चित्रपटात अभिषेकने पुन्हा एकदा जनाचे पात्र साकारून प्रभावित केले.
त्याने सांगितले की, २०१८ मध्ये ‘स्त्री’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याला स्टिरियोटाईप झाला होता. कलाकारांना एकाच प्रकारच्या भूमिका मिळत होत्या. त्यामुळे तो डिप्रेशनचा बळी ठरला होता. त्यानंतर त्याला एक अशी भूमिका मिळाली की ,त्याचे नाव प्रेक्षकांच्या ओठावर रुजले.
एका त्याने ‘स्त्री’ नंतर कोणत्या भूमिका मिळत आहेत, याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, जनाची भूमिका केल्यानंतर मला मुर्ख पात्रं मिळत होती. मी रंगीबेरंगी आणि चमकदार कपडे घालावे आणि त्याच शैलीत संवाद बोलावे, अशी प्रत्येकाची इच्छा होती.