23 वर्षात पहिल्यांदाच बांगलादेशकडून कसोटीत पाकिस्तानचा पराभव

    दिनांक :25-Aug-2024
Total Views |
रावळपिंडी, 
Pakistan-Bangladesh रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला.
 
 
Pakistan-Bangladesh
 
प्रत्युत्तरात बांगलादेशने 565 धावा केल्या आणि 117 धावांची आघाडी घेतली. बांगलादेशने दुसऱ्या डावात पाकिस्तानला 146 धावांत गुंडाळले. बांगलादेशने 30 धावांचे लक्ष्य 10 गडी राखून पूर्ण केले. 29 ऑगस्ट 2001 रोजी बांगलादेशचा संघ पहिल्यांदा पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. Pakistan-Bangladesh बांगलादेशने पाकिस्तानला कसोटीत पराभूत करण्याची जवळपास 23 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, दोन्ही देशांदरम्यान 14 कसोटी सामने खेळले गेले असून पाकिस्तानने 12 कसोटी जिंकल्या आहेत. एक सामना बांगलादेशने जिंकला असून एक कसोटी अनिर्णित राहिली आहे.