- डॉ. सुरेश नाईक
ज्येष्ठ वैज्ञानिक
Space junk : ४ ऑक्टोबर १९५७ रोजी सोव्हिएत रशियाने ‘स्फुटनिक’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात पाठवल्यानंतर अवकाशयुगाला प्रारंभ झाला. त्या क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली. अनेक देश अवकाशात उपग्रह पाठवू लागले. त्यांचे कार्य संपल्यानंतर अंतराळातच अखंड किंवा अवशेष रूपात साठून असल्यामुळे हे उपग्रह एक प्रकारचे अनावश्यक साहित्य बनू लागले. त्यामुळे अवकाशात मानवनिर्मित कचरा साठायला सुरुवात झाली. उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी वापरात येणारे प्रक्षेपकाचे म्हणजे रॉकेटचे भाग, कार्यकाल संपलेले आणि भरकटलेले कृत्रिम उपग्रह, स्पेसवॉक करताना अंतराळवीरांच्या नियंत्रणातून सुटलेल्या वस्तू, उपग्रहांची टक्कर झाल्यानंतर निर्माण झालेले सुटे भाग इत्यादी कारणांनी निर्माण होणारा अंतराळातील ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. आज एक सेंटिमीटरपेक्षा लहान आकाराच्या १३ कोटी तुकड्यांचा कचरा अवकाशात सेकंदाला सात ते आठ किलोमीटर या वेगाने पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे. एक ते दहा सेंटीमीटर आकाराचे ९ लक्ष तुकडे अंतराळात पृथ्वीभोवती भ्रमण करत असल्याचे आढळून आले आहे तर दहा सेंटीमीटरपेक्षा जास्त आकाराचे हजारांपेक्षा अधिक तुकडे कचर्याच्या स्वरूपात अवकाशात पृथ्वीभोवती फिरत आहेत. सुनीता विल्यम्स यांच्या हातातून निसटलेला कॅमेरादेखील आता अंतराळात कचरा म्हणून अनंतकाळापर्यंत फिरत राहणार आहे.
Space junk : पृथ्वीभोवती फिरत असलेल्या कृत्रिम उपग्रहांपैकी सुमारे दोन हजार उपग्रह सक्रिय आहेत तर सुमारे पाच हजार कृत्रिम उपग्रह निष्क्रिय म्हणजे निकामी स्वरूपात आहेत. त्या पोकळीमध्ये ते अनंत तसेच पृथ्वीभोवती भ्रमण करत राहतील. पृथ्वीपासून कमी उंचीत भ्रमण करणारा कचरा हा आठशे ते हजार किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती फिरतो आहे. आज प्रत्यक्षपणे पृथ्वीला त्या कचर्याचा त्रास होत नाही. कारण तो पृथ्वीपासून वर अवकाशात ८०० किलोमीटरवर आहे. त्यातून रेडिएशन होत नसून त्यामुळे आपल्या वातावरणाला आज तरी काही धोका संभवत नाही. या वाढत्या कचर्यामुळे हळूहळू रॉकेट्सचे लाँचिंग करणे कठीण होत जाईल. सतत फिरणार्या अडथळ्यांमुळे त्यांचा प्रवास धोकादायक होत जाईल. चांगल्या उपग्रहांशी त्यांची टक्कर होऊ शकेल. तशा काही घटना घडल्या आहेत किंवा थोडक्यात टळल्या आहेत. त्यामुळे चांगला उपग्रह बरबाद होऊ शकतो किंवा अजून बर्याच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होऊ शकतो.
१० २००६ रोजी अमेरिकेचा वापरात असलेला इरिडियम-३३ हा दळणवळण उपग्रह आणि रशियाचा कार्यकाल संपल्यामुळे निकामी झालेला कॉसमॉस-२२५१ या दोन उपग्रहांची पृथ्वीपासून ७८९ किलोमीटर उंचीवर टक्कर झाली होती. यामुळे १७४० पेक्षा जास्त तुकड्यांचा कचरा अवकाशात इतस्तत: पसरला होता. वापरात नसलेल्या रशियाच्या उपग्रहाची कक्षा बदलली गेल्याने हा अपघात झाला होता. १२ जुलै रोजी इंग्लंडने अवकाशात पाठवलेला ऑलिम्पस-१ हा उपग्रह एका छोट्या लघुग्रहाचा तुकडा आदळल्याने निकामी झाला होता. २४ जुलै १९९६ रोजी कृत्रिम हेरगिरी करणारा फ्रान्सचा उपग्रह एरियन रॉकेटचा तुकडा आदळल्याने निष्क्रिय झाला होता. तर सप्टेंबर १९९१ मध्ये रशियाच्या कॉसमॉस-९५५ या उपग्रहाचा कचरा मार्गात आल्यामुळे अपघात टाळण्यासाठी अमेरिकेच्या स्पेस शटलला जागा बदलावी होती.
Space junk : अंतराळातील कचर्याचे व्यवस्थापन करायचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जात आहे. त्यात आपला इस्रोदेखील भागीदार आहे. आपला देश दोन प्रकारचे उपग्रह सोडतो. इन्सॅट मालिकेचे उपग्रह भूस्थिर कक्षेमध्ये सोडले जातात. पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते आणि २४ तासात एक परिवलन पूर्ण करते. आपण सोडलेले उपग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात आणि ३६ हजार प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यामुळे आपण पृथ्वीवरून पाहिल्यास ते स्थिर दिसतात. कारण तो वेग तुलनात्मकदृष्ट्या शून्य असतो. त्यामुळे त्यांना भूस्थिर कक्षेमधील उपग्रह म्हटले जाते. हे इन्सॅट मालिकेतले भूस्थिर उपग्रह टीव्ही सिग्नल्स, फोन आणि इतर संवादसाधनांच्या मार्गाने आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क क्षेत्रासाठी कार्य करतात.
या इन्सॅट उपग्रहांचे आयुष्य साधारणत: १५ वर्षे कधी कधी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे उपग्रहांची दिशा थोडी भरकटते. अशा वेळी पृथ्वीवरून आज्ञा देऊन ती दुरुस्त केली जाते. अर्थातच त्यावेळी थोडेफार इंधन वापरले जाते. १५ वर्षांच्या काळात हे इंधन संपत येते. तो उपग्रह कचरा म्हणून जाहीर केला जातो. हा कचरा झालेला उपग्रह त्यात उरलेल्या इंधनाचा वापर करून भूस्थिर कक्षेच्या हजारो बाहेर फेकला जातो. या कक्षेत फक्त मृत उपग्रह फिरत असतात. त्याला उपग्रहांची स्मशानभूमी म्हणतात. ही कक्षा लोअर ऑर्बिटमध्येच असते. लोअर ऑर्बिट म्हणजे पृथ्वीपासून १६० ते २००० किलोमीटर उंचीपर्यंतची कक्षा. ही कक्षा भूस्थिर कक्षेच्या खूप वर असते. या प्रकारे आपण आपल्या कचर्याचे व्यवस्थापन करतो. रिमोट सेन्सिंग उपग्रह लोअर ऑर्बिटमध्ये म्हणजे सुमारे ८०० किलोमीटरपर्यंत स्थिर केले जातात. या उपग्रहांचे इंधन संपते तेव्हा त्यांना खाली खेचले जाते. हे उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात शिरतात त्यावेळी जळून नष्ट होतात.
Space junk : आपण उपग्रहांचे प्रक्षेपण करताना सोडत असलेल्या अग्निबाणाचे तीन किंवा चार टप्पे असतात. प्रत्येक वेळी ज्वलन झाले की तो भाग रॉकेटपासून वेगळा होतो आणि पुढच्या टप्प्याचे सुरू होते. सर्वात वरचा टप्पा (ज्याला चरण म्हणता येईल) उपग्रहाबरोबर फिरत राहतो. प्रक्षेपण झाल्यावर त्याचे काम संपून कचर्यात रूपांतर झालेले असते. पण इंधन शिल्लक असल्यामुळे हा धोकादायक असतो. तो इतर कोणत्याही कचर्यावर किंवा उपग्रहावर आदळल्यास स्फोट होतो आणि असंख्य तुकडे होऊन आणखी मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. त्यासाठी आपण झाल्यानंतर त्या चरणातील इंधन काढून टाकतो. त्यामुळे त्यातील धोका संपतो. अवकाशातील कचर्याच्या धोक्याची आधीच सूचना मिळावी यासाठी इस्रोने स्वत:चे एमओटीआर हे रडार विकसित केले आहे. २०१५ पासून हे रडार काम करत आहे. एकाच वेळी ३० सेंटीमीटरपर्यंतच्या १० वस्तू ८०० किलोमीटर अंतरावर असताना टिपण्याची क्षमता या रडारमध्ये आहे. ५० सेंटीमीटरपर्यंतची असल्यास हे रडार एक हजार किलोमीटर अंतरावर असतानाच माहिती देते. त्यामुळे योग्य प्रकारची उपाययोजना करणे शक्य होते.
Space junk : अवकाशात कचरा होऊ नये यासाठी विविध संकल्पनांचा विचार केला जात आहे. त्यात पेट्रोलपंपाप्रमाणे इंधन भरू शकणारा एखादा उपग्रह सोडण्याचाही विचार केला जात आहे. अर्थात ते खूप अवघड काम आहे. परंतु संशोधन सुरू या फिरत्या पेट्रोलपंपांची कल्पना अस्तित्वात आली तर कचरा निर्मितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण करता येईल. कदाचित लवकरच आंतरराष्ट्रीय अवकाश कचरा नियंत्रण कायदा किंवा इतर उपाययोजना प्रत्यक्षात आणल्या जातील. भविष्यात अमेरिका कदाचित चंद्रावर वसाहत स्थापन करेल. भारत, जपानसारखे देश अवकाशात मानवी मोहिमा आखतील. चीनचे स्वतःचे अवकाश स्थानक बांधून पूर्ण होईल. स्पेस सुरुवात झाली आहे. कदाचित पुढील काळात त्याचे प्रमाण अधिक वाढेल. असेही घडू शकेल की, प्रवासी विमानांच्या उड्डाणांप्रमाणे अवकाश मोहिमा आखल्या जातील. अर्थातच यामुळे अवकाशातील कचर्यामध्ये भरच पडत राहील. या कचर्यामुळे भविष्यातील अवकाश मोहिमांना निर्माण होणारा धोकाही वाढत जाईल. त्यामुळे अवकाश कचर्याच्या व्यवस्थापनावर अलिकडे सर्वच देश गंभीरपणे विचार करत आहेत.
-ज्येष्ठ अंतराळ संशोधक आहेत.