- प्रेस क्लबमध्ये शहर अध्यक्षाचा राडा
नागपूर,
नागपूर शहर महिला काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असून शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षांना डावल्या जात असल्याचा आरोप अॅड. नंदा पराते यांनी प्रेस क्लबमध्ये केला. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान चौकात गुरुवारी २९ ऑगस्ट धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी पत्रपरिषदेत दिली. यानंतर नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा Adv. Nanda Parate अॅड. नंदा पराते पोहचल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन होत असताना आपणास जाणीवपूर्वक डावल्या जात आहे.
उद्या काँग्रेसच्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा शहरात येत असताना हा प्रकार होत आहे. गत तीन महिन्यापासून शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना शहरातील एका महत्वाच्या पत्रपरिषदेची माहिती दिल्या जात नाही. तसेच वारंवार फोन केल्यानंतरही कोणत्याही प्रतिसाद मिळत नाही. शहर अध्यक्ष पद सांभाळत असताना नागपूर शहर आणि मध्य नागपूरात अनेक मेळाव्यातून प्रचार प्रसार केला आहे. तरी सुध्दा आपणास सातत्याने डावलण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा गंभीर आरोप अॅड. पराते यांनी केला. उद्या संविधान चौकात होत असलेल्या धरणे आंदोलन आपण शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती Adv. Nanda Parate अॅड. पराते यांनी दिली.
शहर महिला काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या गटातटाचे राजकारण होत नसल्याचे प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी दिले. त्या पुढे म्हणाल्या अॅड.पराते यांना सर्व प्रकारची माहिती एका ग्रुपवरुन दिल्या जाते. तरी सुध्दा काही गैरसमज झाल्यास त्याचे निराकरण केल्या जाईल.महिला काँग्रेसमध्ये समन्वय कायम राखल्या जातो. संविधान चौकात गुरुवारी होत असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रामुख्याने माजी जि.प.अध्यक्ष सुनीता गावंडे, राऊत,अतुल कोटेचा, रेखा चव्हाण आदी उपस्थित होते.
आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या Adv. Nanda Parate अॅड. नंदा पराते यांनी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थिती कॉँग्रेसच्या मुख्यालयात पक्ष प्रवेश केला होता. हलबांचे अनुसूचित वर्गवारीतील हक्क नाकारले गेल्याने समाजावर ओढवलेल्या संकटाबाबत राहुल गांधींना अवगत केले होते. तसेच हलबा समाजासोबत आपण आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते.