श्री.स्वामी विवेकानंद विद्या मंदीर येथे जन्माष्टमी उत्सव सम्पन्न

    दिनांक :28-Aug-2024
Total Views |
नागपूर,
Vidya Mandir Vijayanagar भारतीय जनसेवा संस्थान नागपूर, द्वारा संचालित श्री. स्वामी विवेकानंद विद्या मंदीर विजयनगर कळमना मार्केट येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी शाळेतील विद्यार्थ्यानीं परिसरात शोभायात्रेचे आयोजन केले. सकाळी सडा सम्मार्जन करून सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रीकृष्ण राधा, गोपिका व सवंगडी यांचे तसम देखावे सादर करून त्यांचा शोभयात्रेत सहभाग घेण्यात आला.
 dahihandi
शाळेचे सचिव कृष्णदास गुप्ता, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या बनबाले यांनी कृष्णा जन्माष्टमीची माहिती सांगून व विद्यार्थांना जन्माष्टमीचे महत्व विषद केले. Vidya Mandir Vijayanagar पूजन करून आरती करण्यात आली. विद्यार्थातर्फे दहीहंडी साजरी करण्यात आली. गोपालकाला वितरण करून कार्यक्रमांची सांगता झाली. या कार्यक्रमाला सपना जनबंधू, वैशाली घारपेंडे, श्वेता तिजारे, ममता केकती, खिलनश्वरी पिचोरे, गीता शाहू, शमा कोहळे, पौर्णिमा वर्मा, केशरी गुप्ता, तानिया वर्मा, गुणवंत निषाद, किरण राठोड, अतुल राऊत, प्रियांका काटेकर, सारिका मेश्राम यांनी  परिश्रम घेतले.
सौजन्य:  सतीश देशपांडे, संपर्क मित्र