काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन वक्रद्वार उघडले

29 Aug 2024 20:05:37
अकोला,
 
 
Katepurna Dam-Akola जिल्ह्यात गत आठवड्यापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील जल प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून बार्शिटाकळी तालुक्यातील महान येथे असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या दोन वक्रद्वारातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.Katepurna Dam-Akola काटेपूर्णा प्रकल्पात बुधवार, 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता पाणी पातळी 347.49 मिटर इतकी होती. तर 81.863 दलघमी पाणीसाठा प्रकल्पात आहे. प्रकल्पाची टक्केवारी 94.80 इतकी आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे.
 
 
 
Katepurna Dam-Akola
 
 
Katepurna Dam-Akola काटेपूर्णा प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन आराखड्यानुसार 31 ऑगस्ट अखेर प्रकल्पात 95 टक्के पाणीसाठा असणे निर्धारित आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा सतत वाढत आहे. प्रकल्पाच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने पाण्याचा विसर्ग आवश्यक असल्याने बुधवारी रात्री 9.30 वाजता प्रकल्पाचे दोन वक्रद्वार 30 सेंमी उंचीने उघडून नदीपात्रात 50.16 घनमीटर प्रतिसेकंद एवढा विसर्ग करण्यात येत आहे.
 
 
 
Katepurna Dam-Akola पाणलोट क्षेत्रात पडणार्‍या पावसाचा अंदाज घेऊन पाण्याचा विसर्ग वाढविणे किंवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल.नदीपात्रात होणार्‍या पाण्याचा विसर्ग पाहता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, नदीपात्र ओलांडू नये, असे आवाहन काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाद्वारे करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0