पोलीस कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर यांचे कौतुकास पात्र

29 Aug 2024 15:13:16
नागपूर,
Sudhir Khubalkar Nagpur पती व भाऊ मरण पावलेले होते. दुःख व तणाव सहन न होऊन इंदोरची महिला २६ ऑगस्टला आत्महत्या करण्यासाठी निघाली होती. याचा काही ठाव ठिकाणा तिच्या घरच्यांना नव्हता. तिच्या घरच्यांनी इंदोर पोलिसांना याची तक्रार केली. इंदोर पोलिसांना त्यांच्या जवळच्या माहितीच्या आधारावर ती महिला नागपूरला गेलेली आहे असे समजले.त्या वरून त्यांनी शांतीनगर पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे माहिती दिली.
sudhir
संपूर्ण नागपुरात अशी कुठलीही व्यक्ती हरविल्याची तक्रार जर आली तर त्याची माहिती तात्काळ या विषयाचे तज्ञ सुधीर खुबाळकर यांना मिळते. सुधीर खुबाळकर यांनी आपल्या चमू सह सगळीकडे शोधणे सुरू केले. बस स्थानक, रेल्वे स्थानक असा सर्व परिसर धुंडाळत असताना त्यांना एक महिला जगनाडे चौकातील गायत्री मंदिराच्या फुटपाथ वर बसलेली दिसली. तिच्याकडे पाहून त्यांना संशय आला. Sudhir Khubalkar Nagpur त्यांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये नेले व व तिची आस्थेने विचारपूस केली. हळूहळू महिलेला पोलिसांबद्दल विश्वास वाटला व तिने त्यांना सर्व आपबीती सांगितली. या घटनेची माहिती तात्काळ इंदोर पोलिसांना देण्यात आली व इंदोर वरून महिलेची मुलगी व जावई नागपूरला दाखल झाले.पोलिसांनी या महिलेला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. त्यावेळी मात्र त्या महिलेच्या घरच्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते.
 
अशा आतापर्यंत ११५ पेक्षा अधिक व्यक्तींना शोधून काढणारे, हरवलेल्या लोकांचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे व शांतीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Sudhir Khubalkar Nagpur ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुणा यादव पोलीस कॉन्स्टेबल निखिल मेश्राम यांनी केली.
सौजन्य: अमोल पुसदकर, संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0