बालकांच्या मदतीसाठी 1098 हेल्पलाईन

29 Aug 2024 18:57:17
अकोला,
संकटात सापडलेल्या मुलांच्या मदतीसाठी 1098 ही child helpline number चाईल्ड हेल्पलाईन सर्व दिवस चोवीस तास सुरू आहे. कुठेही बालक संकटात असल्याचे जाणवताच नागरिकांनी हेल्पलाईनचा वापर करून त्याला मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
 
 

piipn 
कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात child helpline number सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते अठरा वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीकरिता केंद्र व राज्याच्या महिला व बाल विकास विभागामार्फत चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकते किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त डॉ. नारनवरे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0