नागपूर,
R. S. Mundle English School शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेली शिक्षण संस्था, धरमपेठ शिक्षण संस्था, आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत सामाजिक जाणीव दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भालचंद्र हरदास उपस्थिती होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांचा, शाळेत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रत्येक विषयातील सर्वाधिक गुणांच्या प्रायोजित केलेल्या बक्षीसांसोबतच विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. R. S. Mundle English School इयत्ता १० वी च्या वर्गात परीक्षेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली शाळेची विद्यार्थिनी सई सोमलवार हिने याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ,दैनंदिन अभ्यासावर भर दिल्यास आपण नक्कीच चांगले यश प्राप्त करू शकतो,असेही तिने यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सुचवले. सोहम मुठाळ या विद्यार्थ्यानेदेखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेतील शिक्षकांतर्फे संगीता तांबोळी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि मार्गदर्शनपर आपले विचार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीवेची मुल्ये रुजवण्याच्या हेतूने शाळेतून जमा केलेला निधी स्वीकार या सेवाभावी संघटननेच्या प्रतिनिधी मीनाक्षी दामले यांना हस्तांतरीत करण्यात आला. R. S. Mundle English School या संपूर्ण कार्यक्रमासाठी दिपाली जैन आणि मंजिरी वैद्य यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. विनय मोडक यांनी स्थापना दिनानिमित्त लिहिलेल्या सामूहिक गीताचे देखील, यावेळी शाळेच्या संगीत शिक्षिका प्राची मुळे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
प्रा.डॉ. हरदास यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपला सगळ्यांनी SWOT विश्लेषण (शक्ती, कमकुवतपणा, संधी, धोके) करायला हवा. आपले सामर्थ्य ओळखून संधीचा सदुपयोग करायला हवा. प्राचीन भारतीय संस्कृतीतून परंपरागत चालत आलेले शास्त्रशुद्ध ज्ञान जोपासायला हवे. हे सगळे करत आपल्या देशाची भारत ही ओळख जोपासायला हवी. त्यांच्या संवादात्मक शैलीला विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. R. S. Mundle English School विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी संयुक्तपणे काही उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे कोषाध्यक्ष आनंद आपटे, आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. पद्माकर चारमोडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा बर्मन, याप्रसंगी उपस्थित होत्या. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: प्रीती लांबे, संपर्क मित्र