- निविदा प्रक्रिया देखील वेगोन होणार
- उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
- भाजपाचे जिल्हा महाअधिवेशन
वरुड,
Wainganga-Nalganga project विदर्भात सिंचनाची क्रांती घडविण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळेल आणि लवकरच त्याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपा अमरावती जिल्हा विस्तारीत कार्यकारणीचे महाअधिवेशन शनिवारी वरूड येथील रामदेव बाबा मंगलम येथे आयोजिण्यात आले होते. सदर अधिवेशनाचा समारोप करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ नेते चैनसुख संचेती, भाजपा जिल्हाध्यक्ष खा. अनिल बोंडे, माजी खा. नवनीत राणा, आ. प्रताप अडसड, जयंत डेहकर, प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले, केवलराम काळे, निवेदिता चौधरी, किरण पातुकर, शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी, राजेश वानखडे, डॉ. मनोहर आंडे, गोपाल चंदन, रावसाहेब रोठे, प्रवीण तायडे, नितीन गुडधे, विवेक गुल्हाने, रेखा मावसकर, विलास कविटकर, ज्योती सोळंके यांच्यासह अन्य उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदनच्या प्रस्तावासह अन्य प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आले.
Wainganga-Nalganga project फडणवीस पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या प्रत्येक योजना मतदारांपर्यंत पोहचवा आणि विधानसभेकरिता जोमाने कामाला लागा. लोकसभेच्यावेळी विरोधकांनी खोटा प्रचार केला. जनतेच्याही ते लक्षात आले आहे. लाडकी बहिण योजनेला विरोधकांकडून विरोध होत आहे. कितीही विरोधा झाला तरी ही योजना अंमलात येणारच आहे. सत्तेत असताना काँग्रेसला शेतकरी, शेतमजुर, गरिब, एससी, एसटी आवठत नाही. सत्तेतून बाहेर झाल्यावर त्यांच्या पोपटांना कळवळा येतो. राज्यात पुन्हा महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात खा. बोंडे म्हणाले, अमरावती जिल्हा हा लव्ह जिहादचा हब बनत आहे. याला आवर घालण्यासाठी हिंदूत्वादी विचारधारेच्या लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जातीय जनगणनेची राहुल गांधी तर सगेसोयरेची मनोज जरांगे यांची मागणी चुकीची आहे. जरांगेचा बोलवता धनी कोण असा सवाल उपस्थित करत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रात इतके मराठा मुख्यमंत्री झाले. मराठा आरक्षणासाठी कुणीही समोर आले नाही. फडणवीस यांच्यामुळेच आरक्षण मिळाले. फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र रचल्या आत असल्याचा आरोप त्यांनी केला. सूत्रसंचालन वरूड तालुका अध्यक्ष राजकुमार राऊत तर आभार अंजली तुमडाम यांनी मानले. अधिवेशनाला जिल्ह्यातल्या भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.
खा. बोंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
Wainganga-Nalganga project भाजपाचे जिल्हाध्यक्ष खा. अनिल बोंडे यांचे वाढदिवसनिमित्त महाअधिवेशनात अभिष्टचिंतन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित सर्व नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी खा. बोंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी दिव्यांग बांधवांना तीच चाकी स्कूटरचे वाटप करण्यात आले. गत तीन वर्षांमध्ये विविध कृषी पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील पुरस्कारार्थ्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.