पर्यावरणपूरक ई-बससेवेच्या प्रवासी संख्येत वाढ

    दिनांक :30-Aug-2024
Total Views |
- ई-बसमधून ३१ हजारांवर प्रवाशांनी केला प्रवास
- नागपूर विभागाला मिळाले ३२ लाखाचे उत्पन्न
 
नागपूर,
E-Bus Services एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातर्फे १४ ऑगस्टपासून पर्यावरणपूरक सुरू करण्यात आली. गत बारा दिवसात २५ ऑगस्टपर्यंत ३१ हजार ३५० प्रवाशांनी ई-बसमधून प्रवासाचा आनंद घेतला आहे. तसेच एसटी महामंडळाला ई-बसेसच्या माध्यमातून नागपूर विभागाला ३२ लाख ३८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रदूषण रोखण्यासाठी ई-बसेस चालविण्यास सुरूवात केली आहे. पर्यावरणपूरक ई-बसेसला सर्वच मार्गावर चांगला मिळत असल्याने ई-बसेसची मागणी वाढली आहे.
 
 

e-bus
 
अनेक बसेस कालबाह्य
E-Bus Services एसटी महामंडळाच्या ताफ्यात जुन्या एसटी असल्याने त्यातून प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. अनेक बसेस नादुरुस्त आणि कालबाह्य झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. डिझेलवरील बसेसमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एसटी महामंडळाने आता ई-बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विभागाने पहिल्या टप्प्यात ओलेक्ट्रा ९ मीटर लांब, २६ ई-बसेस वेगवेगळया मार्गावर सुरु केल्या आहेत. प्रामुख्याने या ई-बसमध्ये ३५ आरामदायी आसन व्यवस्थेसह आपत्कालीन थांब्याकरीता स्वतंत्र बटण देण्यात आली आहे. ई-बसेसच्या प्रत्येक आसनावर एसी व्हेंट व मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट, सुरक्षेसाठी फायर सेफ्टी सिलिंडर व ग्लास ब्रोकन हॅमरची सुविधा असल्याची माहिती एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक गभणे यांनी दिली.
 
 
ई-बसेसच्या संख्येत वाढ
E-Bus Services मुख्यत: नागपूर ते जलालखेडा ई-बसला १४ ऑगस्ट रोजी हिरवी झेंडी दाखवून नागपूर विभागातर्फे ई-बससेवा सुरू केली होती. पहिल्या दिवसी सहा ई-बसेस धावल्या. त्यानंतर हळूहळू ई-बसेसच्या संख्येत वाढ करण्यात आली असून सध्या २५ ई-बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. सर्व २५ ई-बसेस प्रवाशांच्या सेवेत प्रवासी संख्या वाढत आहे. नागपूर विभागाकडे एक ई-बस अतिरिक्त असून त्यास गर्दीच्या मार्गावर चालविण्यासाठी ठेवण्यात आली आहे. नागपूरच्या गणेशपेठे बसस्थानकातून सद्यःस्थितीत नागपूर-जलालखेडा-नागपूर, नागपूर-काटोल-नागपूर, नागपूर- वर्धा-नागपूर, नागपूर-हिंगणघाट नागपूर, नागपूर-सावनेर-नागपूर, नागपूर-रामटेक-नागपूर, नागपूर-लाखनी-नागपूर, नागपूर-भंडारा-नागपूर आणि नागपूर-जाम-नागपूर या मार्गावर ई-बसेस चालविण्यात येत आहेत. ई-बसमध्ये महिला सन्मान योजना, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक योजना, ७५ अमृत ज्येष्ठ नागरिक योजना यासह विविध योजना लागू आहेत.