- शरद पवारांची भूमिका
मुंबई,
जीवाला असलेला धोका पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने ज्येष्ठ नेते Sharad Pawar शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शरद पवार यांनी आज ही सुरक्षा घेण्यास नकार दिला. माझ्या जीवाला नेमका कोणत्या प्रकारचा धोका आहे, याची माहिती आधी मला केंद्राने द्यावी, नंतरच मी यावर निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
या सुरक्षेबाबत शरद संशय व्यक्त केला होता. कदाचित विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माझ्याकडून काही गोपनीय माहिती काढण्यासाठी ही सुरक्षा दिली असावी, असे पवार यांनी म्हटले होते. अशातच आज पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
झेड प्लस सुरक्षेतील काही अटी पवारांनी नाकारल्या आहेत. सुरक्षा गाडी वापरण्याचा आग्रह पवारांना अमान्य आहे तसेच घरात सुरक्षा कडे नसावे, अशी त्यांची इच्छा आहे. या बैठकीत सीआरपीएफचे महासंचालक उपस्थित होते. त्यांच्याकडून Sharad Pawar शरद पवारांना सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय का घेण्यात आला, यासह इतर माहिती देण्यात आली.
पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यामागील कारण केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले नाही. पवारांच्या दिल्लीतील भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. तथापि, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतरच आपण ही सुरक्षा स्वीकारायची की नाही, याबाबत निर्णय घेणार असल्याचे Sharad Pawar पवारांनी सांगितले.