नवी दिल्ली,
लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेरिकेला जाणार आहेत. त्यांचा दौरा तीन दिवसांचा आहे. या दौर्यादरम्यान ते डलास आणि वॉशिंग्टनला भेट देतील, अशी माहिती इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने दिली. Rahul Gandhi राहुल गांधी यांची अमेरिका भेट पंतप्रधान नरेंद्र यांच्या न्यू यॉर्क दौर्यापूर्वी आहे.
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी सांगितले की, राहुल गांधी ८ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील डलास शहराला भेट देणार आहेत. वॉशिंग्टनमध्ये ते ९ आणि १० सप्टेंबर रोजी असतील. यादरम्यान राहुल गांधी भारतीय वंशाचे लोक, विद्यार्थी, व्यापारी, थिंक टँक आणि स्थानिक नेत्यांशी संवाद साधतील. राहुल विरोधी पक्षनेते झाल्यापासून विदेशात स्थायिक झालेले भारतीय वंशाचे लोक, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ, नेते, व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून मोठ्या प्रमाणावर त्यांना येण्याची विनंती करण्यात आली.
डलासमध्ये Rahul Gandhi राहुल गांधी टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधणार असल्याची माहितीही पित्रोदा यांनी दिली. ते स्थानिक भारतीय समुदाय आणि काही ‘टेक्नोक्रॅट्स’ना भेटतील तसेच, डलास भागातील ते डिनरही करणार आहेत. दुसर्या दिवशी ते वॉशिंग्टन डीसीला जातील, जिथे ते थिंक टँक, नॅशनल प्रेस क्लब आणि इतरांसह विविध लोकांशी संवाद साधणार आहेत.