- क्रिप्टो घोटाळा प्रकरण
नवी दिल्ली,
बनावट Crypto Scam Case क्रिप्टो कंपनीच्या माध्यमातून लडाख व इतर काही ठिकाणांवरील लोकांची फसवणूक करण्याच्या आरोपात ईडीने कंपनीच्या ऑपरेटर्सवर छापेमारी करीत एक कोटी रुपयांची रोकड आणि आक्षेपार्ह दस्तावेज केले. बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत लेह, जम्मू आणि हरयाणातील सोनिपत येथे शुक्रवारी ही छापेमारी करण्यात आली. ईडीने लडाखमध्ये पहिल्यांदाच छापेमारी केली आहे. एमॉलिएन्ट कॉईन या क्रिप्टोकरन्सीच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास केवळ दहा महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करून द्यायचे आमिष दाखवत लेह तसेच इतर ठिकाणच्या लोकांची फसवणूक केली होती, असे ईडीने निवेदनात आहे.
Crypto Scam Case या बनावट क्रिप्टोकरन्सीचे प्रतिनिधित्व आणि प्रचार सोनीपतच्या नरेश गुलियाने इमॉलिएन्ट कॉईन लि. नावाच्या कंपनीद्वारे केला होता, ज्याची युनायटेड किंगडमध्ये सप्टेंबर २०१७ मध्ये स्थापना केली होती. लेहमध्ये अजयकुमार चौधरी आणि जम्मूचे चरणजितसिंह उर्फ चुन्नी तसेच लेहचे अत्तिउल रहमान मीर यांनी लेह येथे व्यवसायाचा प्रचार केला आणि गुंतवणूकदारांना आश्वासन देण्यात की, त्यांची गुंतवणूक १० महिन्यांत दुप्पट केली जाईल.