सात्या खणताना तरुणावर रानडुकराचा हल्ला

05 Aug 2024 21:14:57
- दांडेगाव जंगल परिसरातील घटना

लाखांदूर, 
सकाळच्या सुमारास जंगल परिसरात सात्या गोळा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर Lakhandur- Wild boar attack रानडुकराने हल्ला केला. या घटनेत जिरोबा येथील पप्पू मुस्तफा शेख (30) हा गंभीर जखमी झाला. ही घटना 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तालुक्यातील दांडेगाव जंगलात घडली.
 
 
dfg
 
Lakhandur- Wild boar attack पावसाळ्यात जंगलात आणि शेताच्या परिसरात सात्या मोठया प्रमाणात निघत असून त्यांना नागरिकांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे विविध भागातील नागरिक जंगल परिसरात सात्या काढण्यासाठी जातात. दरम्यान पप्पू शेख हा देखील सात्या आणण्यासाठी दांडेगाव जंगलात गेला होता. यावेळी सात्या काढत असताना अचानक रानडुकराने त्याच्यावर केला. तरुणाने आरडाओरडा करताच जंगलात उपस्थित असलेले इतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रानडुक्कराला हाकलून लावले. यावेळी जखमी पप्पू ला लाखांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. प्रथमोपचानंतर त्याला पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती लाखांदूर वनविभागाला होताच वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0