अर्जुनी मोरगाव,
competitive exam विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच स्पर्धा परिक्षेची तयारी करणे गरजेचे आहे. शैक्षणिक यश संपादन करण्यासाठी विपरीत परिस्थितीही आडवी येऊ देवू नये. नियमीत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन अभ्यास कराल तरच लक्ष पूर्ण होईल. कारण विपरीत परिस्थितीत स्पर्धा परिक्षेत यश संपादन करणे ही सर्वात मोठी उपलब्धी आहे, असे प्रतिपादन युवा सामाजीक कार्यकर्ते तथा युवक जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.भारत लाडे यांनी केले.

अर्जुनी मोरगाव विधानसभाअंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव डव्वा येथील हेमंत रमेश भुरकूडे या विद्यार्थ्यांने स्पर्धा परिक्षेत यश संपादन करुन पोलिस उपनिरीक्षक या प्रशासकीयपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानी 4 ऑगस्ट रोजी डॉ. भारत लाडे यांनी त्याचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करुन अभिनंदन केले. competitive exam यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. हेमंत भुरकुडे यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन जिद्द व चिकाटीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. यावेळी डॉ. भारत लाडे यांनी सदर विद्यार्थ्याचे आई वडीलांचेही अभिनंदन करुन हेमंत भुरकुडे याला पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक युवक व कार्यकर्ते तथा ग्रामवासी उपस्थीत होते.