पुणे,
भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते, प्रचारक Dr. Sudhakar Kulkarni डॉ. सुधाकर कुलकर्णी यांचे ६ ऑगस्ट रोजी सकाळी भोपाळ निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेली ५० वर्षे भारतीय मजदूर संघाच्या कामांमध्ये त्यांनी आपले योगदान दिले. आयुर्वेदिक डॉक्टर असलेले डॉ. कुलकर्णी हे मूळचे नागपूरचे. त्यांचा मध्यप्रदेशमध्ये स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. दत्तोपंत ठेंगडी यांच्या आग‘हाने त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बंद करून भारतीय मजदूर पूर्ण वेळ काम सुरू केले. आयुष्यभर अविवाहित राहून संघ प्रचारक म्हणून त्यांनी काम केले.
Dr. Sudhakar Kulkarni : महाराष्ट्र, मध्यप्रदेश आदी ठिकाणी काम केल्यानंतर त्यांना आसाम आणि ईशान्य भारतातील सात राज्यांची जबाबदारी देण्यात आली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मजदूर संघाचे काम त्या ठिकाणी सुरू केले. सुमारे १५ वर्षे त्यांनी त्या भागात काम त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र, विदर्भ, गोवा अशी क्षेत्र प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. येथेही त्यांनी चांगले काम केले. भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. गेल्या अनेक दिवसांपासून ते भोपाळमध्ये आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.