काटोल शहरात बेवारस प्राण्यांचा हैदोस...

    दिनांक :06-Aug-2024
Total Views |
 katol
नागपूर, 
stray animals काटोल शहरांमध्ये मागील ३ वर्षे अगोदर कोरोना काळ असताना एका चिमुकल्यावर लावारिस बेवारस कुत्र्यांनी हल्ला करून त्याचा बळी घेतला असता. बेवारस कुत्रे आणि डुक्कर यांचा काटोल शहरातील नागरिकांना तसेच पंचवटी येथील राऊत लेआउट , येवले लेआउट परिसरामध्ये कुत्र्यांचा प्रादुर्भाव हा मोठ्या संख्येने वाढलेला आहे. या भागांमध्ये डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथील या परिसरातील रहिवासी डॉ. झुंबळे यांना डुकराने चावले त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या लहान मुलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे लहान मुलांना खेळण्याकरिता, नागरिकांना घराबाहेर पडणे धोक्याचे वाटत आहे. अशी कैफियत शिवसेनेचे अमोल तांदूळकर यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद काटोल, आरोग्य अधिकारी यांच्याकडे ही बाब लक्षात घेऊन मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद काटोल यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी उपस्थित राऊत लेआउट येथील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सौजन्य: देवाशिष टोकेकर, संपर्क मित्र