शिवलीलामृत : उपासना उपास्य ग्रंथ!

Shree Shivlilamrut-Shravan भगवान शंकराची साधना

    दिनांक :06-Aug-2024
Total Views |
धर्म-संस्कृती 
 
 
- प्रा. दिलीप जोशी
Shree Shivlilamrut-Shravan ‘शिवलीलामृत' हा भगवान शिवांच्या कथांचे भक्तिरसग्रहण असून तो प्रासादिक शिव आख्यान ग्रंथ आहे. सर्वज्ञात आख्यान कवी आणि संत प. पू. श्रीधरस्वामी नाझरेकर गुरुमाउलींनी हे शिवलीलामृत लिहिले आहे. साधारणतः २३ फेब्रुवारी १७१९ रोजी हा पारायण ग्रंथ पूर्णत्वास आला. Shree Shivlilamrut-Shravan श्रीधरस्वामी बारामतीतील कऱ्हा नदी तीरावरील काशी विश्वेश्वराच्या मंदिरात बसले असता त्यांना भावसमाधी लागली. भगवान विश्वनाथाच्या स्नेहाचिया वागिश्वरीचा प्रसाद मिळून शिवलीलामृत ग्रंथ भगवान महादेवांनी त्यांच्याकडून लिहून घेतला. Shree Shivlilamrut-Shravan ब्रह्मकमंडलू नदीच्या तीरावर द्वादशमती नगरी म्हणजे हल्लीच्या कऱ्हा नदी तीरावरील बारामतीमध्ये भगवान काशी विश्वनाथ हे अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे. बारामती येथील या काशी विश्वनाथासमोरच त्यांनी शिवलीलामृत वाग्यज्ञ सुरू केला आणि तिथेच या वाग्यज्ञाची पूर्णाहुती झाली. Shree Shivlilamrut-Shravan भगवान महादेवांनी त्यांची आर्तता पाहून शिवलीलामृत लिहिण्याचा आदेश दिला आणि तुझ्या मुखातून मीच बोलेन, असा आशीर्वादही दिला. त्यानुसार हा आख्यान ग्रंथ ओवीबद्ध झाला.
 
 

Shree Shivlilamrut-Shravan 
 
 
शिवलीलामृताचे एकूण १४ अध्याय असून २४५३ ओव्या आहेत. १५ वा अध्याय सर्व ग्रंथांचे सार म्हणून प्रचलित आहे. एका अर्थाने गुरुचरित्राप्रमाणे ती अवतरणिका आहे; पण तो मूळ पारायण ग्रंथाचा भाग म्हणता येणार नाही. ज्यांना संपूर्ण पारायण करणे शक्य नाही, त्यांना हा १५ वा सार अध्याय नित्य वाचता यावा म्हणून हा सार अध्याय आहे. Shree Shivlilamrut-Shravan हादेखील श्रीधरस्वामी रचितच आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. मात्र, काहींच्या मते १५ वा अध्याय कोणी लिहिला याबाबत स्पष्टता नाही. शिवलीलामृतावर नितांत श्रद्धा असणारे संपूर्ण महाराष्ट्रात करोडो भक्त आहेत. आता तर हा आख्यान ग्रंथ भारतातील अनेक भाषांत भाषांतरित झाल्यामुळे संपूर्ण भारतातही या ग्रंथाची पारायणे होतात. विशेषतः महिला भक्तांमध्ये या ग्रंथाविषयी श्रद्धा, निष्ठा आणि आकर्षण आहे. अनेक ठिकाणी प्रचंड संख्येत पारायण सोहळे आयोजित केले जातात. Shree Shivlilamrut-Shravan श्रद्धेय श्रीधरस्वामींनी सर्व शब्दसिद्धी आणि शब्दशक्तींचा वापर करून नितांतसुंदर, गोड आणि माधुर्याने ओतप्रोत असा हा दिव्य शिवलीलामृत ग्रंथ लिहिला आहे. भगवान शिवांच्या विविध कथा साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत त्यांनी ओवीबद्ध केल्या आहेत. सर्वसामान्य भाविकांना श्रावण महिन्यात भगवान शंकराची साधना करण्यासाठी हा ग्रंथ सहज उपयोगी आहे.
 
 
 
Shree Shivlilamrut-Shravan साधना म्हणून या ग्रंथाचे पारायण करता येते, ज्यांना पारायण शक्य नसेल ते आपल्या ईप्सिताप्रमाणे एक-दोन अध्यायही वाचू शकतात. अनेक जण दररोज केवळ ११ वा अध्याय नित्यनेमाने पठन करतात. या ग्रंथाला मुहूर्त, स्थळकाळवेळेचे बंधन नाही. Shree Shivlilamrut-Shravan शूचिर्भूत होऊन प्रसन्न अंतःकरणाने प्रसन्न जागी हा ग्रंथ qकवा ग्रंथातील अध्याय आपण पठन अथवा श्रवण करू शकतो.
‘ॐ नमोजी शिवाअपरिमिता । आदि अनादी मायातीता ।।
पूर्णब्रह्मानंद शाश्वता । हेरंब ताता जगद्गुरो।।'
या श्लोकाने प्रारंभ होणारे शिवलीलामृतातील शब्द म्हणजे ‘शब्द जैसे कल्लोळ अमृताचे' जेथ चातुर्य शहाणे झाले आणि प्रमेय रुचिशी आले. भगवान महादेवाच्या सुरस कथातून आध्यात्मिक उन्नयन या ग्रंथातून होते. शिवलीलामृतातील कथा या महर्षी व्यासांच्या स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवकथा असून सामान्य लोकांना सहज समजाव्या म्हणून श्रीधरस्वामींनी त्या सोप्या शब्दात आणि समजेल, अशा भाषेत मांडल्या आहेत. Shree Shivlilamrut-Shravan पहिल्याच अध्यायात दाशार्ह राजाच्या कथेतून ‘ॐ नमः शिवाय' या शिव पंचाक्षरी मंत्राचे महत्त्व विशद केले आहे. दुसऱ्या  अध्यायात पारधी (व्याध) आणि हरिणीच्या कथेतून माघी शिवरात्रीचा महिमा सांगितला आहे. तिसऱ्यात गोकर्ण महाबळेश्वराचे महिमान आणि कल्मशपाद उद्धार वर्णन विदित केले आहे. चौथ्या अध्यायात विमर्षण आणि कुमुद्वतीच्या कथेतून स्थान माहात्म्य, सव्य-अपसव्य प्रदक्षिणा आणि शिखरप्रदक्षिणा महत्त्व सांगितले आहे.
  
 
 
Shree Shivlilamrut-Shravan पाचव्यात शिवप्रदोष तर सहाव्यात सोमवार व्रत माहात्म्य सांगताना अनुक्रमे सत्यरथ इंदुमती आणि चित्रांगद सिमंतिनी यांच्या कथेतून स्पष्ट केले आहे. सातव्या अध्यायात सुमेधा आणि सोमवंत, मदन आणि qपगळा, सुमती आणि भद्रायू यांच्या कथा आहेत तर आठव्यात भद्रायू आख्यान आहे. नववा अध्याय अत्यंत फलदायी असा असून त्यात वामदेव नावाचे योगी यांनी भस्म माहात्म्य सांगून ब्रह्मराक्षसास मुक्ती दिल्याची कथा आहे. याच अध्यायात शबर पती-पत्नीचा उद्धार चिताभस्म व्रतामुळे कसा झाला याचे प्रासादिक वर्णन आहे. Shree Shivlilamrut-Shravan दहाव्यात शारदा आणि पद्मनाभ आख्यान असून उमामहेश्वर व्रतदीक्षा विहित आहे. अकरावा अध्याय अत्यंत लोकप्रिय असून फलदायी असा अध्याय आहे. या अध्यायात भद्रसेन राजाचा मुलगा सुधर्मा आणि प्रधान पुत्र तारक यांचा अपमृत्यू टाळल्याची कथा आहे. Shree Shivlilamrut-Shravan सोबतच महानंदा, कुक्कुट, मर्कट आणि शिवव्रती महादेव यांची कथा सांगून रुद्राक्ष माहात्म्य सांगितले आहे. बाराव्यात बहुलेचा उद्धार आणि भस्मासुर वधाची कथा आहे. तेराव्यात दक्षयज्ञ विध्वंस कथा, त्रिपुर दहन कथा, शिव-पार्वती विवाह, स्कंद जन्म म्हणजे कार्तिकेय जन्म आख्यान आणि तारकासुराचा वध सांगितला आहे.
 
 
 
 
Shree Shivlilamrut-Shravan चौदाव्यात भगवती पार्वतीचे भिल्लीन वेशातील आगमन, श्रियाळ आणि चांगूणा तथा चिलीया बाळाची कथा आहे.
शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायाचा सांगता श्लोक या ग्रंथाचा आशय सांगतो.
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड।
स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड।
सदा परिसोत सज्जन अखंड।
अमुक अध्याय गोड हा श्रावण मासात आपल्या सर्वांसाठी ‘शिवलीलामृत' हा ग्रंथ सहज फलदायी, सहज वाचनीय, सहज समजणारा पारायण ग्रंथ आहे. त्यातल्या त्यात किमान अकरावा अध्याय तरी नित्य नेमाने निरागस वृत्तीने वाचल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, हा सर्वांचा विश्वास आहे. Shree Shivlilamrut-Shravan हा ग्रंथ उपासना उपास्य ग्रंथ असून हा ग्रंथ म्हणजे अक्षर शिव आहे. ग्रंथाचे केवळ पूजन केले तरी शिवपूजनाचे पुण्य मिळते म्हणून हा उपास्य ग्रंथ आहे. या ग्रंथाचे पारायण ही भगवान शिवाची उपासना आहे. म्हणून हा उपासना उपास्य ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ घरात असला, तरी अध्यात्माविषयी आकर्षण निर्माण होते. Shree Shivlilamrut-Shravan परमपूजनीय श्रीधर स्वामी स्वतःच लिहितात की, मी केवळ निमित्तमात्र असून माझ्या मुखातून साक्षात भगवान महादेवांनीच हे शिवलीलामृत गायिले आहे. विशेषतः श्रावण महिन्यात शैव आणि वैष्णव हा भेद विसरून या ग्रंथाचे पठन सर्वत्र होत असते. शिवलीलामृत हा कामधेनु असून ऐहिक सुखासोबतच पारलौकिक सुख देण्याचे सामथ्र्य असलेला कल्पवृक्ष आहे.
९८२२२६२७३५