अमरावती,
Educational Marathi News : अमरावती जिल्हा परीषद मधील प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकार्यांची पदे रिक्त असल्यामुळे शासनाचे विविध उपक्रम प्रभावित झाले आहे. विदर्भातील शाळा सुरू होऊन एक महीना उलटला आहे. या काळात शासनाने विविध उपक्रम सुरु केले आहे. शिक्षण सप्ताह, विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान, मुख्यमंञी माझी सुंदर शाळा, नव साक्षरता असे उपक्रम पर्यवेक्षिय यंञेनेतील रिक्त पदांमुळे प्रभावित झाले आहे. शासनाने अमरावती जिल्हा परीषदच्या शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात येत आहे.
अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालकपदी निलिमा टाके यांची नियुक्ती शासनाने केली होती. पण, त्या रुजु न झाल्यामुळे त्यांचा पदभार शिवलिंग पटवे सांभाळत आहे. पाच जिल्हाचे मुख्य पद असताना ते सुध्दा प्रभारी अधिकारी सांभाळत आहे. अमरावती जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरीक्त पदभार उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने सांभाळत आहे. उपशिक्षणाधिकारीचे दोन पदे रीक्त आहे. एका पदाचा पदभार भातकुली पं.स.चे गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे यांच्याकडे दिला आहे. शासनाने नव्याने निर्माण केलेले योजना शिक्षणाधिकारी हे पद रिक्त झाले असून त्याचा अतिरीक्त पदभार शिक्षण विस्तार अधिकारी मानकर यांना दिला आहे. अमरावती जि.प.ला १४ गटशिक्षणाधिकारी मंजुर आहे.
त्यापैकी ५ आहेत, ९ पदे रीक्त असून त्या पदांचा अतिरीक्त पदभार कुठे शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे तर कुठे केंद्र प्रमुख यांच्याकडे आहे. जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीची ३७ पदे मंजुर असून १७ कार्यरत आहे. २० पदे रिक्त आहे. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांची २० पदे मंजुर आहे. पैकी ५ पदे रिक्त आहेत. या पदाचा अतिरीक्त पदभार कुठे केंद्र प्रमुखांकडे तर कुठे पाञ मुख्याध्यापक यांच्याकडे आहे. जिल्हात केंद्र प्रमुख यांची १४० पदे मंजुर असुन पदोन्नतीची ३१ पदे रीक्त आहे. सरळ सेवेची ७० पदे रिक्त आहे. पाञ मुख्याध्यापक आणि विषय शिक्षक, सहा.शिक्षक यांची शेकडो पदे रिक्त आहे. गुणवत्तेत जिल्हा आणायचा असेल तर ही रिक्त पदे भरणे आवश्यक आहे.
शिक्षणाधिकारी ते पाञ मुख्याध्यापक हे पर्यवेक्षिय यंञणा आहे. हीच पूर्ण नसेल तर शिक्षण विभागाचा डोलारा कसे चालेल. अतिरीक्त पदभारामुळे सर्व यंञना मेटाकुटीला आली आहे. पदोन्नती करुन रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. अमरावती जिल्हात प्राथमिक शिक्षकांची ३०० पदे रिक्त आहे. त्यामुळे दोन शिक्षकी शाळा एक शिक्षिकी झाल्या असून काही शाळांमध्ये एका शिक्षकांकडे दोन ते तिन वर्ग देण्यात आले आहे. त्या शाळेची गुणवत्ता कशी वाढेल, त्यात शिक्षकांकडे अशैक्षणिका कामे आणि आभासी कामे आहेत. जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवायची असल्यास शाळांना पूर्ण शिक्षक असणे आवश्यक आहे.