मंगरुळनाथ,
सर्व्हर डाऊन E-POS machineअसल्याने धान्य वाटपास अडचणी निर्माण होऊन त्यामुळे ग्राहक व रेशन दुकानदारात वाद होत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी या संदर्भात संघटनेने तहसील कार्यालयास पूर्व सूचना देवून होती ई-पॉस मशीन जमा करून घेण्याची विनंती संघटनेने केली आहे.याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
सार्वजनिक वितरणE-POS machine व्यवस्थेच्या संगणीकरणानंतर सन २०१८ पासून कार्ड धारकाला ई - पॉस मशीन व्दारे धान्य वाटप करण्यात येते. मात्र मागील दोन महिन्यापासून धान्य वाटप करतांनी ई - पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन होणे, अचानक मशीन बंद पडणे अशा अडचणी येत आहे. याबाबत संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना वारंवार निवेदने देण्यात आली. सर्व्हर डाऊन असल्यामुळे व मशीन बंद असल्यामुळे कार्ड धारकांना रोजगार बुडवून दिवसभर ताटकळत दुकानासमोर धान्य घेण्यासाठी बसावे लागते. तरी सुध्दा त्यांना धान्य मिळत नाही. या सर्व बाबीमुळे राज्य संघटनेने महाराष्ट्रातील सर्व ई - पॉस मशीन तहसील कार्यालयमध्ये जमा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.
यावेळी संघटनेचेE-POS machine तालुकाध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष सुधाकर चौधरी, सचिव निलेश पाटील, संघटनेचे पदाधिकारी लाईक भाई अहमद, नारायण बाहेती, श्रीमंत खांडेकर, छोटू बेग कादर बेग, वनमाला पेंढारकर, आर. जी. हवा, नवजीवन महिला बचत गट आदीसह तालुक्यातील रेशन दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.