वेध
नीलेश जोशी
‘जाकी रही भावना जैसी, प्रभू मूरत देखी तिन तैसी...’ कवी तुलसीदासांनी ‘रामचरित मानस’ या ग्रंथात या ओवी लिहिल्या आहेत. ईश्वराला ज्या रूपात तुम्ही पाहाल त्या रूपात ईश्वर दिसेल, असा अर्थ या ओवींचा होतो. अर्थात, पवित्र भावनेने ईश्वराला स्मरणे मात्र आवश्यक आहे. ईश्वराचे स्मरण तर दूरच; ईश्वराच्या, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वाबाबत शंका घेणारे महाभाग आजही येथे आहेत. एकीकडे बौद्ध बहुसंख्य असलेल्या श्रीलंकेतही प्रभू श्रीराम, सीता तसेच रावणादींशी संबंधित स्थाने जतन करण्याचा, त्यांचे संवर्धन, विकास करण्याचा प्रयत्न होतो. तर, दुसरीकडे ‘प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वाचा पुरावा नाही,’ असे तामिळनाडूतील द्रमुक अर्थात द्रवीड मुन्नेत्र कळघम् पक्षाचा S. S. Shivshankar एस. एस. शिवशंकर बरळतो. हे अनवधानाने अज्ञानातून केलेले विधान नक्कीच नव्हे तर येथील धर्म, संस्कृतीच्या द्वेषातून केलेले हे विधान आहे. अर्थात ज्या इंडिया आघाडीशी द्रमुकचा संबंध आहे त्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा हा द्वेष वारंवार यापूर्वीही समोर आला आहे.
S. S. Shivshankar : तामिळनाडूसह देशात विविध ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थाने आहेत. लहान-थोर, श्रीमंत-गरीब, शिक्षित-अशिक्षित अशा सर्वच हिंदूंची ही श्रद्धास्थाने. विज्ञानाच्या कसोटीवर ज्यांना या बाबी तपासायच्या असतात त्यांच्याकरिता जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन करणार्या इस्रोनेदेखील रामसेतूचे अस्तित्व मान्य केले आहे. पण झोपेचेे सोेंग घेणार्याला उठविता येत नाही, हेच सत्य. भारतात श्रीरामाने वास्तव्य केलेल्या विविध ठिकाणांसह ज्या तामिळनाडूत हे मंत्री राहतात त्या तामिळनाडूतील येथे स्वतः प्रभू श्रीरामाने स्थापन केलेलेे रामेश्वरम्चे शिवलिंग यासह श्रीलंकेत प्रभू श्रीराम, सीतामाई यांच्याशी संबंधित असलेली स्थाने हा श्रीरामाच्या अस्तित्वाचा पुरावा नव्हे तर काय? पण ज्यांना संभ्रमच निर्माण करायचा आहे. धर्म, संस्कृती नाकारायची आहे त्यांना अशा प्रकारच्या विधानांचा आधार घेतल्याशिवाय पर्याय तरी कोणता? ज्या द्रमुकच्या मंत्र्याने हे विधान केले द्रमुकच्या अन्य नेत्यांनी या पूर्वीही प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे (कु) पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी तर ‘हिंदू धर्म हा डेंग्यू, मलेरियासारखा असून तो संपविणे आवश्यक आहे.’ असे चिड येणारे विधान केले होते. तर, ए. राजा नावाच्या नेत्याने हिंदू धर्माची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोगाशी केली. धर्म, संस्कृती ही मुळातच सहिष्णू आहे. त्यामुळेच धर्म, संस्कृतीविरोधात बरळणार्यांचे फावते. ज्या देशात ‘राम’ प्रहरापासून दिवसाची सुरुवात होते. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जिथे माणसांच्या नावात ‘राम’ आहे. एकमेकांना भेटल्यानंतर रामनामाचा घोष होतो आणि अनंताच्या प्रवासाला जातानाही ‘रामनाम सत्य’ असल्याचे जिथे स्मरण होते तिथे रामाच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित करणेच आहे. हिंदू सहिष्णू आहे, म्हणजे डरपोक आणि कमजोर असल्याचा समज या धर्मविरोधी नेत्यांचा झाला आहे. पण या राजकारण्यांचा जीव मतपेटीतील पोपटात असल्याची जाणीव आता हिंदूंनाही झाली असून योग्यवेळी या पोपटाची मान आवळण्यास हिंदू मागे-पुढे पाहणार नाहीत.
S. S. Shivshankar : देशाच्या एका टोकावर असलेल्या तामिळनाडूतील घटनेबाबत संताप वाटत असतानाच मुंबईतील धारावी येथे घडलेल्या घटनेने मन प्रक्षुब्ध झाले. अरविंद वैश्य या २२ वर्षीय तरुणाची धर्मांधांनी निर्घृण हत्या केली. एक भांडण सोडविण्याचे निमित्त या हत्येला कारणीभूत असले, तरी तो संघाचा स्वयंसेवक, बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे म्हणून ही हत्या झाल्याचे बोलले जाते. पोलिसांसमक्ष ही हत्या करण्यात आली. एवढेच नव्हे, तर दुसर्या दिवशी त्याच्या अन्त्ययात्रेवर धर्मांधांनी केली. पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप केला. मोठा बंदोबस्त तेथेे लावण्यात आला होता. पण मुळात कोवळ्या वयातील अरविंद यांनी तेथे अतिक्रमण, लव्ह जिहाद यासारख्या विषयांसाठी पुढाकार घेतल्याने त्यांना जीव गमवावा लागला. एकीकडे कोटी-कोटी हिंदूंचे आराध्य असलेल्या प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावणारे कुटिल राजकारणी तर दुसरीकडे धर्माभिमान बाळगून चुकीच्या बाबी समाजात होऊ देण्यासाठी लढणारे धारावीतील अरविंद वैश्य या दोनही घटना राष्ट्रभक्त नागरिकांच्या मनात चिंतेचे काहूर उठविणार्या आहेत. हिंदूंचा सहिष्णू भाव हे बलस्थान असले, तरी हिंदुत्व टिकवून राहण्यासाठी योग्य व आवश्यक प्रसंगी संवैधानिक पद्धतीने संघटित शक्तीद्वारे चोख उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.
- ९४२२८६२४८४