कचरा संकलनासाठी आता कर आकारणी

कचर्‍यातून पालिका होणार कोट्यधीश

    दिनांक :09-Aug-2024
Total Views |
गोंदिया, 
Garbage collection : गोंदिया शहरात कचर्‍याची बजबजपुरी झाली आहे. कचरा प्रक्रिया नसल्याने पोलिकेची अडचण वाढली आहे. अशात आता पालिका प्रशासनाने घरातून निघणारा कचरा संकलनाकरिता कर आकारने सुरु केले आहे. कचरा करातून पालिकेला वर्षाकाठी 2 कोटी रुपयांची मिळकत होणार आहे.
 
 
huihjk
 
 
शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढ चालला आहे. शहरात दरवर्षी सुमारे तीनशे घराचे बांधकाम करण्यात येते. परिणामी विस्तार वाढत चालला आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मुलभूत सोयी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. कार्यकाळ संपल्यामुळे आता नगरसेवक देखील नाही. पालिकेचा कारभार प्रशासक असलेले मुख्याधिकारी सांभाळत आहेत. एकटा व्यक्ती संपूर्ण शहराकडे लक्ष घालू शकत नसल्यामुळे शहरात समस्यांचा डोंगर उभा आहे. शहरातील सर्वात मोठी समस्या कचर्‍याची आहे. पालिकेला शंभर वर्षापासून अधिक काळ लोटून देखील पालिकेकडे स्वतःच्या मालकीचा डम्पिंग यार्ड नाही. गेल्या कित्येक वर्षापासून शहरातील गणेशनगर परिसरातील मोकळ्या भूखंडावर कचरा टाकण्यात येत होता. मात्र त्यावर नागरिकांनी आक्षेप नोंदविल्यामुळे तिथे कचरा टाकणे बंद झाले. शहराची लोकसंख्या सव्वा लाखांवर गेली असून 45 हजार कुटूंब वास्तव्यास आहेत.
 
 
पालिकेकडे डम्पिंग यार्ड नसल्यामुळे पालिका प्रशासनासमोर कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न उभा ठाकला आहे. मात्र डोकेदुखी असलेला कचरा आता पालिकेला कोट्यधीश करणार आहे. शहरातील घरगुती कचर्‍याकरिता 360 रुपये तर व्यावसायीक कर धारकांकडून 504 रुपये वार्षिक कर आकारण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. कचर्‍याच्या माध्यमातून पालिकेला वर्षाकाठी दोन कोटी रुपयांचा कर जमा होणार आहे.