गणेश उत्सवात वीज सुरक्षेला प्राधान्य द्या : महावितरण

    दिनांक :01-Sep-2024
Total Views |
यवतमाळ :
Ganesh Utsav : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणेशाच्या आगमनाला काही दिवस असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा, यासाठी गणेश उत्सवासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात व घरगुती वीज पुरवठ्याच्या दराने गणेशोत्सवासाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महवितरणच्या अखत्यारीतील सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुतीप्रमाणेच विजेचे निश्चित केले आहेत.
 
 
Ganesh Utsav
 
Ganesh Utsav : त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता गणेश मंडळांनी २४ तास सुरू असणारे जिल्ह्याचे दैनंदिन सनियंत्रण ७८७५७६३०९९ यासोबतच नि:शुल्क क्रमांक १९१२, १९१२०, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ यावर संपर्क साधावा अथवा मोबाईल क्रमांकाची नोंद असलेले वीज ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल करून अथवा १२ अंकी ग्राहक क्रमांक असा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवून वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार देऊ शकतात. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
सार्वजनिक सुरक्षा महत्वाची : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्सवात Ganesh Utsav मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा, यासाठी सार्वजनिक रोषणाई आणि मिरवणुकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी. वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित झाल्याने अपघात होण्याची शक्यता असते. वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी. तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लावून जोडावी.