यवतमाळ :
Nandlal Rathore : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र जय भारत चौक यवतमाळ येथे २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात ज्या १९५३ च्या अधिनियमांनुसार माहे जून आणि डिसेंबरमध्ये कामगार कल्याण निधी कपात केल्या जाते. अश्या कामगार, कामगार कुटुंब यांना विविध योजनाचा लाभ घेता येतो. यामध्ये राज्य परिवहन, एमएसईबीचे सर्व कंपनी, जीवन प्राधिकरण, एलआयसी विभाग, वण विभाग, सर्व बँक, सहकारी बँका, अर्बन बँक, रेमंड युको कंपनी, व सर्व ठेकेदार कामगार, एमआयडीसी कंपनी, जिंनिंग, प्रियदर्शनी सूतगिरणी, हॉटेल, पेट्रोलपंप, मॉल, वर्क शॉप, साखर कारखाना, संजीवन हॉस्पिटल, criticare हॉस्पिटल, व मोठे हॉस्पिटल, कार शो रूम, इत्यादी ठिकाणचे सर्व कामगार खालील योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Nandlal Rathore : सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना, विशेष शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, परदेश शिक्षण शिष्यवृत्ती, एमएससीईटी सहाय्य योजना, पाठ्यपुस्तक सहाय्य योजना, लेखन साहित्य प्रकाशन कॉम्प्युटर टायपिंग सहाय्य योजना, गंभीर आजार सहाय्य योजना इत्यादी योजनांचा लाभ घेण्यासाठी
public.mlwb.in या वेब साईटवर आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावेत, याकरिता सर्व कुटुंब आधारकार्ड, सर्व पासपोर्ट फोटो, माहे जून २०२४ ची पगारस्लिप असे कागदपत्र लागतात, वरील योजनेसाठी मार्कशिट, बोनाफाईड, बँक खाते, स्वयंघोषणापत्र, एमसीआयटी मार्कशिट, पावती, पुस्तक पावती, मुख्याध्यापक दाखला, प्रमाणपत्र, पावती, गंभीर आजारसंबंधी कागदपत्र लागतात. याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम ३१ सप्टेंबर आहे. वरील सर्व योजनेची अधिक माहिती कामगार कल्याण केंद्र जय भारत चौक यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन केंद्र संचालक गजानन सोनटक्के यांनी केले आहे.