आज गोळवलकर गुरुजी यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा

10 Sep 2024 06:00:00
- सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची प्रमुख उपस्थिती
 
नागपूर,
द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव Golwalkar Guruji गोळवलकर गुरुजी यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा सीताराम भवन, ५ वा माळा, रामनगर चौक, येथील दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को. ऑप. संस्थेच्या मुख्य कार्यालयात १० सप्टेंबर दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते अनावरण सोहळा होणार असून संस्थेच्या अध्यक्ष निलिमा बावणे यांच्यासह उपाध्यक्ष सारिका पेंडसे, किशोर बावणे, विवेक जुगादे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वसुले आदी उपस्थित राहतील.
 
 
golwalkar
 
संस्थेने ३१ व्या वर्षात पदार्पण केले असून संस्थेच्या मुख्यालयात सरसंघचालक माधव सदाशिव Golwalkar Guruji गोळवलकर गुरुजी यांच्या तैलचित्र प्रेरणा देणारे ठरणार आहे. अनावरण प्रसंगी सरसंघचालक डॉ. भागवत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच सिताराम भवन परिसरात महागणपतीची आरती मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती विवेक जुगादे यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0