नवी दिल्ली,
Albert Einstein-atom bomb आपल्या संशोधनातून जगभरातील लोकांसाठी लाभदायक शोध करणारे आणि मानवतावादी दृष्टीकोनातून संशोधन करणाऱ्या अल्बर्ट आईन्सटाईनला कोण ओळखत नाही? त्यांच्याशी जुळलेल्या प्रत्येक वस्तूला आणि कागदपत्रांना आजही मौल्यवान मानलं जातं. नुकतीच याची प्रचिती आली. अणूबॉम्बविषयी गोपनीय माहिती देणारं अल्बर्ट यांचं पत्र निलामीमध्ये ३.९ मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ३३ कोटी रुपयांना विकल्या गेलं. हे पत्र आईन्सटाईन यांनी वर्ष १९३९ मध्ये अमेरिकेचे (US) राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी.रूझवेल्ट (Franklin D.Ruzvelt) यांना लिहिलं होतं.
Albert Einstein-atom bomb अणू बॉम्ब आणि त्याच्या परिणामांविषयी अलर्ट देणारं हे पत्र आहे. अणूबॉम्बच्या निर्मितीवर अभ्यास आणि संशोधन करण्याची गरज अल्बर्ट आईन्सटाईनने राष्ट्राध्यक्षांना सांगितली होती. त्यांच्या या सूचनेनुसार संशोधन झालं आणि दुसऱ्या महायुद्धात (second world war) अणूबॉम्बच्या हल्ल्याचा (Japan) मार्ग मोकळा झाला होता. हे संशोधन किती घातक ठरू शकतं, हेदेखील त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. हे पत्र न्युयॉर्कच्या फ्रँकलिन डी. रुझवेल्ट ग्रंथालयात ठेवण्यात आले होते.
Albert Einstein-atom bomb या पत्रात आईन्सटाईनने जर्मनी आण्विक शस्त्रांचा वापर करू शकते, अशी शक्यता वर्तविली आहे. त्यासोबतच, युरेनियमचा वापर नवीन आणि महत्त्वपूर्ण ऊर्जा स्रोत म्हणून केला जाऊ शकतो, हे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, याच ऊर्जेचा वापर भीषण संहारक अणू बॉम्ब बनविण्यासाठीही केला जाऊ शकेल, हे त्यांनी पत्रात लिहिले आहे. या पत्रानंतरच, अमेरिकन सरकारने परमाणू संशोधन तीव्रतेने राबविले आणि मॅनहटन प्रोजेक्टची सुरुवात झाली.
Albert Einstein-atom bomb या प्रोजेक्टनंतरच अमेरिकेने अणूबॉम्ब बनविला. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निलाम झालेले हे पत्र मूळ प्रत असून मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांच्या संग्रहात ते होते. त्यांनी वर्ष २००२ मध्ये २ मिलियन डॉलर्समध्ये ते विकत घेतलं होतं. अमेरिकेच्या परमाणू कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाèया, अल्बर्ट आईन्सटाईन यांनी नंतर ही आपली ‘सर्वात मोठी चूक' असल्याचे म्हटले होते.