मानसिक टॉर्चर, पत्नीचा मृत्यू, पती मरणासन्न अन् आरोप झेडपीवर!

15 Sep 2024 13:28:38
जळगाव,
 
 
Jalgaon-crime-ZP-CEO दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या ताणाचा परिणाम विविध आजार आणि विशेषत: ह्रदयविकारांमध्ये दिसून येतो आहे. जळगावातील एका घटनेत महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, हा धक्का सहन न झालेल्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, त्यांच्या कुटूंबियांनी या दुर्दैवी घटनेचे खापर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर फोडले आहे.
 
 

Jalgaon-crime-ZP-CEO 
 
Jalgaon-crime-ZP-CEO जळगाव जिल्ह्याच्या शासकीय आशादीप संस्थेच्या अधिक्षिका मयुरी राऊत आणि त्यांचे पती आणि जिल्हा परिषदेतील कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत या दाम्पत्याची ही शोकदायक कहाणी आहे. प्राथमिक माहितीनुसार राऊत यांना त्यांच्या पत्नी रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. उपचारादरम्यान पत्नी मयुरी फोनवर बोलत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लोकांनी त्यांना उचलून दवाखान्यात नेले पण, त्यांना मृत घोषित करण्यात आले. याबाबत त्यांच्या पतीला समजताच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
 
Jalgaon-crime-ZP-CEO या राऊत दाम्पत्याला दोन आणि सहा वर्षांच्या दोन मुली आहेत. हे कुटूंब मूळ संगमनेरचे राहणारे आहेत. या घटनेला जिल्हा परिषद मुख्याधिकारी अंकित जबाबदार असल्याचा आरोप मयुरी राऊतचे वडील भाऊसाहेब करपे यांनी केलाय. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी देवेंद्र राऊत यांना सातत्याने अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे मानसिक तणावातून हा सगळा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप करपे यांनी केला.
 
Jalgaon-crime-ZP-CEO मयुरी यांचा काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पती देवेंद्र यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या देवेंद्र राऊत यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मानसिकदृष्ट्या टॉर्चर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होईपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा तिच्या वडिलांनी दिला आहे. या घटनेत जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणीही कुटूंबियांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0