सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण उत्साहात संपन्न

15 Sep 2024 19:49:47
नागपूर, 
Matrubhumi Seva Foundation मातृभूमी सेवा फाऊंडेशन मध्य नागपूर, द्वारे नागपुरातील गणेशभक्तांसाठी दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळ, दक्षिणामूर्ती चौक ,महाल येथे रविवारी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत श्री गणपती अथर्वशीर्ष स्तोत्राचे २१ आवर्तनाचे सामूहिक पठण करून गणेशभक्तांनी गणेशभक्तीचा आनंद अनुभवला.
  
 
gnu
 
 
सकाळी ९ वाजता दक्षिणामूर्ती गणपती बाप्पाची मंगल आरती करून मंगलार्चंन करून विधीवत सामूहिक ५००१ अथर्वशीर्ष आवर्तन पठण संकल्प भाविकांनी पूर्ण केला. या कार्यक्रमाची संकल्पना आमदार प्रवीण दटके यांची असून गणेशभक्तांनी स्तोत्र पठणास भारतीय मंगलवेष परिधान करून सोहळ्यात उपस्थित होते. Matrubhumi Seva Foundationया कार्यक्रमाला आमदार प्रवीण दटके, विवेक धाक्रस आणि दक्षिणामूर्ती मंडळाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ श्रीरंग वराडपांडे यांचे असून मातृभूमि प्रतिष्ठानचे श्वेता भोसले, सुजाता काथोटे, रंजना गुप्त,शिंगरू, सुरेश गुप्ता, यांनी  सहकार्य केले.शेवटी गणपतीची फलश्रुती, गजर करून मंगल आरती व प्रसाद वितरित करण्यात आला.
सौजन्य: डॉ श्रीरंग वराडपांडे,संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0