सांस्कृतिक इतिहास लेखनाचा खंड लवकरच प्रकाशित होणार

16 Sep 2024 14:26:14
Dr. Shripad Bhalchandra Joshi कला, संस्कृती, भाषा, स्थापत्य, उद्योजकता, आदि अनेक क्षेत्रांत वैभवशाली सांस्कृतिक वारसा असलेल्या विदर्भाच्या सांस्कृतिक इतिहासाचे संशोधन आणि दस्तऐवजीकरणाचा हवे तसे अद्याप झालेले नाही. त्यामुळे या प्रदेशातील समृद्ध संस्कृती, सांस्कृतिक प्रतिभा, कार्य याची पुरेशी दखलच उर्वरित महाराष्ट्रात व देशविदेशात हवी तशी घेतली जात नाही.
dr
विदर्भ हा प्रदेश प्राचीन काळापासून आजतागायत सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध भूभाग राहिला आहे. ललित साहित्य, संशोधन, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला ,ज्योतिर्विद्या, गणित, कृषी, नृत्य, नाट्य, संगीत, लोककला, लोकसंगीत, विविध चळवळी, संस्था, संघटना, वृत्तपत्रे, नियतकालिके, भाषा, सण, उत्सव, लोकपरंपरा, लोकसाहित्य या आणि अशा कितीतरी क्षेत्रांत विदर्भ प्रांताने आपले वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वैभव जोपासले आहे. Dr. Shripad Bhalchandra Joshi असे असतानाही विदर्भाच्या सलग अशा सांस्कृतिक इतिहास लेखनाचा प्रयत्न मात्र अद्याप झालेलाच नव्हता.
 
या पार्श्वभूमीवर 'विदर्भाचा सांस्कृतिक इतिहास ' हा प्रकल्प संकल्पिला गेला होता. ज्येष्ठ कवी, संशोधक, समीक्षक, लेखक डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी हे या प्रकल्पाचे संकल्पक-संपादक असून पुणे येथील अनुबंध प्रकाशन हा प्रकल्प- ग्रंथ प्रकाशित करणार आहेत. Dr. Shripad Bhalchandra Joshi विदर्भातील अकरा जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासाचे लेखन विदर्भातील भाषा, साहित्य व संस्कृतीचे स्थानिक अभ्यासक करीत आहेत. त्यातील सहा जिल्ह्यातील सांस्कृतिक इतिहासाचे लेखन कार्य पूर्ण झाले असून या इतिहासाचा पहिला खंड लवकरच प्रकाशित होणार आहे.
 
या खंडातील नागपूर जिल्हा प्राचीन काळापासून आजतागायत सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेला आणि विदर्भातील कला , संस्कृती, पुरातत्व, साहित्य, समाजकारण आदि क्षेत्रांचे नेतृत्व करणारा आहे. Dr. Shripad Bhalchandra Joshi अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह व लेखक डॉ.विलास चिंतामण देशपांडे यांनी नागपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासाचे लेखन केले आहे . साहित्य,कला क्षेत्रात कायम अग्रेसर असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासाचे लेखन सामाजिक कार्यकर्ते , मुक्त पत्रकार व आता हयात नसलेले लेखक नरेन्द्र लांजेवार यांनी केले आहे.
 
साहित्य, कला, संस्कृती, पुरातत्व अशा विविध क्षेत्रात सांस्कृतिक दृष्ट्या वेगळेपण आणि समृद्धी जोपासणाऱ्या वाशीम जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासाचे लेखन पत्रकार व लेखक विवेक चांदुरकर यांनी, अकोला जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासाचे लेखन वऱ्हाडी भाषेचे अभ्यासक डॉ.रावसाहेब काळे यांनी तर भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहास लेखनाचे कार्य कवी , चित्रकार व समीक्षक प्रमोदकुमार अणेराव यांनी केले आहे. Dr. Shripad Bhalchandra Joshi उर्वरित जिल्ह्यांतील लेखन कार्यापैकी, प्रसिद्ध पत्रकार व लेखक प्रा.कुमार बोबडे हे अमरावती जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासाचे लेखन करीत आहेत.
 
स्वातंत्र्यपूर्व कालखंड ( प्राचीन ते १९४७ ), स्वातंत्र्योत्तर कालखंड (१९४७ ते १९९०) आणि समकालीन कालखंड (१९९० ते २०२०) या तीन कालखंडातील सांस्कृतिक इतिहासाचे लेखन हे प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
 
प्रादेशिक सांस्कृतिक इतिहास लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न 
इतिहास लेखनात प्रादेशिक, विभागीय, स्थानिक इतिहासाचे सर्वाधिक महत्वाचे स्थान आज जगभरच अधोरेखित झाले आहे. संस्कृतिच्या प्रांतातही अशा प्रादेशिक इतिहास लेखनाशिवाय जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील स्थानिक प्रतिभांचे ऐतिहासिक मोलाचे योगदान, कार्य, त्यांचे स्थान व मूल्य अधोरेखित होणार नाही यावर आज जगभरच एकमत आहे. Dr. Shripad Bhalchandra Joshi या पार्श्वभूमीवर 'विदर्भाचा सांस्कृतिक इतिहास' हा सुमारे सातशे पृष्ठांचा दोन खंडातील महत्त्वाचा लेखन प्रकल्प असून या प्रकल्पासोबतच 'मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास' या सर्वच वाङ्मय प्रकारवार स्वतंत्र अशा खंडांच्या महत्त्वाकांक्षी बृहद् प्रकल्पाचे काम देखील काही अभ्यासक - संशोधक यांच्या सहकार्याने सुरू आहे. 'विदर्भाचा सांस्कृतिक इतिहास' आणि 'मराठी वाङ्मयाचा वैदर्भीय इतिहास' या दोन्ही अशा प्रकल्पांच्या लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे,भाषा, साहित्य, संस्कृती क्षेत्रातील अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरेल, अशी प्रतिक्रिया या प्रकल्पाचे संकल्पक- संपादक  डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0