स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात

    दिनांक :18-Sep-2024
Total Views |
- पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन
 
नागपूर, 
'Swachhta Hi Seva' campaign दक्षिण- पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे येत्या २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान राबविले जाणार आहे. रेल्वे मंडळाच्या निर्देशानुसार या पंधरवाड्यांतर्गत दररोज वेगवेगळ्या थीमवर स्वच्छता कार्यक्रम हाती घेण्यात आला याशिवाय रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा, सीसीटीव्ही, पोस्टर्स, बॅनर, पथनाट्य, चर्चासत्र आदींद्वारे प्रवाशांना स्वच्छता अंगीकारण्याचे व राखण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
 
 
Swachhta Hi Seva
 
'Swachhta Hi Seva' campaign यात प्रामुख्याने विविध कार्यक्रमात प्रभातफेरी, पथनाट्य, जनजागृतीवर सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता मित्र सुरक्षा शिबिर, मॅरेथॉन-वॉकेथॉन स्पर्धा, एक झाड आईच्या नावे, टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर, रिसाइकिल उत्पादनांची विक्री, स्वच्छ भारत मिशन स्पर्धा, स्वच्छ सांस्कृतिक, उत्सव स्टेशन व रेल्वेत सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता बेस किचन, खाद्यपदार्थ स्टॉल व पेंट्रीकारची स्वच्छता आदींचे आयोजन करण्यात आले आहे.