नागपुरच्या रस्त्यावर नड्डा कबाबची धमाल...व्हिडीओ वायरल

18 Sep 2024 13:48:08
नागपूर,
Nagpur Street Food : नागपूरची खाद्य संस्कृती खवय्यांसाठी सतत नवनवीन पदार्थ सादर करत आहे. नुकतेच नागपूरच्या प्रसिद्ध रस्त्यांवर एक नवीन आणि अनोखा पदार्थ खवय्यांना आकर्षित करत आहे. या पदार्थाचे नाव आहे "नड्डा कबाब". हे नाव जरी खास असले तरी त्याची बनवण आणखी खास आहे. आपण या नागपूरच्या खास पदार्थाचा आस्वाद कसा घ्यावा ते बघूया.
 
ALOO NADDA
 
 
 
नड्डा कबाब हा आलू फिंगरचा एक वेगळा अवतार आहे. हा पदार्थ एका व्हिडिओत दाखवला आहे ज्यामध्ये आलू फिंगरमध्ये उकळलेल्या ताजे बटाटे, मसाले, आणि खास तळणीने त्याला दिलेला कुरकुरीतपणा. याचे चवदार मिश्रण बनविण्यासाठी लाल तिखट, हिरवी मिरची, जिरे, धणे आणि काही गुप्त मसाले घालून त्याचे मिश्रण तयार केले जातात. आणि त्या तळलेल्या नड्याच्या आत उकळलेल्या ते आलूचे मिश्रण स्टफ केले जात आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि प्लेटमध्ये सर्व करतांना त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या जसे कि तिखट, गोड, चिंच-गुळ आणि खास मिंट चटणी अशी चटण्यांची निवड त्यासोबत देण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक चवीचा एक हटके अनुभव मिळतो.
 
 
 
हा पदार्थ नागपुरच्या रस्त्यावर खूप लोकप्रिय होत आहे कारण यात फ्यूजनचा अनोखा प्रयोग आहे. लोकांना आलूच्या या फिंगरमध्ये असलेली चव आणि चटण्यांची विविधता लोकांना खूप जास्त आवडत आहे. त्यामुळे नड्डा कबाब हा पदार्थ खवय्यांसाठी एक नवीन आकर्षण बनला आहे.
 
 
 
 
 
जर तुम्ही नागपुरात असाल आणि काहीतरी खास आणि मसालेदार खाण्याचा मूड असेल, तर आलू फिंगर नक्कीच ट्राय करा! जर तुम्ही नागपूरमध्ये असाल तर नक्कीच एकदा नड्डा कबाबचा आस्वाद घ्या आणि त्या हटके फ्यूजनचा आनंद लुटा. नागपुरात हा पदार्थ अनेक ठिकाणी मिळतो, मात्र त्यातल्या त्यात “खाऊ गल्ली” आणि “इंनिंग्स पाणिपुरीवाला” ची आलू फिंगर चांगली ओळखली जाते.
Powered By Sangraha 9.0