राजे रघुजी महाराज भोसले यांनी सुरू केली परंपरा

-उत्सवाला यंदा २३५ वर्षे झाली पूर्ण

    दिनांक :02-Sep-2024
Total Views |
नागपूर,
Bhosale Palace Nagpur लहान मुलांना बैलांचे व शेतीचे महत्त्व समजावे म्हणून १७८९ मध्ये नागपूरचे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले दुसरे यांनी सुरू केलेला तान्हा पोळा उत्सवाला यंदा वर्षे पूर्ण झाली आहे. नागपूरसह विदर्भात तान्हा पोळा ही एक ओळख झाली आहे. मुख्यत: पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू असून या दिवशी लहान मुले लाकडी बैलांना सजवून पोळा साजरा करतात.
bhosle
दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांनी लहान मुलांना बैलांच्या श्रमाचे महत्व कळावे यासाठी पोळ्याची सुरुवात केली. यासाठी त्यांनी खास लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटले. बैलांप्रमाणे या लाकडी नंदीला सजविण्यात आले. मैदानात आंब्याचे तोरण लावून मुलांना उभे करून पूजा करण्यात आली. Bhosale Palace Nagpur पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत मुलांना खाऊ, पैसे, वाटण्यात आले. या प्रथेला यंदा २३५ वर्षे पूर्ण होत आहे.
सर्वात मोठा बैल ऐटीत उभा राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. त्यांचे निवासस्थान असलेल्या महालातील सीनियर भोसले पॅलेसमध्ये सर्वात मोठा लाकडी बैल दिमाखात उभा आहे. Bhosale Palace Nagpur या बैलांची उंची आठ फूट तर सहा फूट आहे. त्याच्या पायात चांदीचा तोडा आहे. ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले वाजत गाजत मिरवणूक काढायचे तीच परंपरा राजे महाराज भोसले यांनी कायम ठेवली आहे.