माजी नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

    दिनांक :02-Sep-2024
Total Views |
पुणे, 
पुणे महानगरपालिकेचे Former corporator Vanraj Andekar माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी सोमवारी तीन संशयितांना अटक करण्यात आली. रविवारी आंदेकर यांच्यावर शस्त्रांनी हल्ला चढवत गोळ्या घालण्यात आल्या होत्या. सततच्या वादावरून आंदेकर यांच्या नातेवाईकाने हा हल्ला केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
 
 
Vanraj Andekar
 
Former corporator Vanraj Andekar रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने मोटारसायकलवरून येऊन आंदेकर यांच्यावर नाना पेठ परिसरात हल्ला केला. आंदेकर यांच्यावर काही फैर्‍या गोळीबार करण्यात आला तसेच डोक्यावर धारदार शस्त्रांनी करण्यात आल्याचे अधिकार्‍याने सांगितले. दोन संशयितांना स्थानिक पोलिसांनी तर अन्य एका संशयिताला गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याचे अतिरिक्तपोलिस आयुक्त प्रवीण पाटील यांनी सांगितले. काही गोळ्या झाडण्यात आल्याचा साक्षीदारांचा दावा आहे, पण आंदेकर यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्रांनी जखमा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे पाटील सांगितले.