रवींद्र वायकरांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा निर्देश

    दिनांक :02-Sep-2024
Total Views |
मुंबई, 
लोकसभा निवडणुकीला आव्हान देत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सादर करा, असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेचे खासदार Ravindra Vaikar रवींद्र वायकर यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव झाला.
 

Ravindra Vaikar 
 
Ravindra Vaikar : रवींद्र वायकर यांची निवडणूक अवैध ठरवण्यात यावी आणि आपल्याला विजयी घोषित करण्यात यावे, अशी विनंती कीर्तिकर यांनी केली. कीर्तिकर यांनी जुलैमध्ये याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने वायकर यांना समन्स बजावला. न्या. जयदीप मारणे यांच्या एकलपीठासमोर वायकर यांच्या वतीने वरिष्ठ वकील अनिल साखरे यांनी सोमवारी युक्तिवाद केला. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३ ऑक्टोबरला ठेवली आहे.