मोट हाकलतो एक...!

02 Sep 2024 05:03:11
वेध
 
 
- अनिरुद्ध पांडे
pola festival-Maharashtra
‘येहेरीत दोन मोटा, दोन्हीमधी पानी एक
आडोयाले कना चाक, दोन्हीमधी गती एक
दोन्ही नाडा समदूर, दोन्हीमधी झीज एक
दोन्ही बैलांचे ओढणे, दोन्हीमधी ओढ एक
उतरणी चढणीचे, नाव दोन धाव एक
मोट हाकलतो एक, जीव पोसतो कितीक...' pola festival-Maharashtra
मराठी मातीतल्या ज्येष्ठ कवी बहिणाबाई चौधरी ‘शेतीत राबणाऱ्या, मोट ओढून कितीतरी जीव पोसणाऱ्या' बैलांचे किती समर्पक वर्णन करतात पहा. आपल्या विदर्भात या बैलांच्या सणाला ‘पोळा' एवढेच म्हणतात. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मात्र या पोळ्याचा उल्लेख ‘बैलपोळा' असा करतात. का कुणास ठाऊक; विदर्भात मात्र पोळा हा बैलांचाच सण याबद्दल वेगळी काही संकल्पना नाही. pola festival-Maharashtra तिकडे वेगळाही काही पोळा असतो की काय असे वाटते, ‘बैलपोळा' ऐकले की...! श्रावणातील ही पिठोरी अमावास्या. या पिठोरीला पोळा सण साजरा करतात.
 
 

pola festival-Maharashtra 
 
 
pola festival-Maharashtra हिंदू परंपरेत हाच मातृदिनही आहे. आज वेगवेगळे आंतरराष्ट्रीय व इंग्रजी मातृदिन साजरे केले जात असल्यामुळे ही परंपरा मागे पडलेली दिसते. या पारंपरिक मातृदिनी ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणी, महालक्ष्मी आणि चामुंडा या मातृरूप देवतांची भिंतीवर चंदनाने चित्रे काढून पूजा केली जाते. काही ठिकाणी त्यांच्या पिठाच्या मूर्ती करून त्यांची पूजा केली जाते. नैवेद्यही पिठाचाच असतो, म्हणून या दिवसाला ‘पिठोरी अमावास्या' असेही म्हणतात. या मातृदिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान माता, महिलांचा सत्कार अनेक ठिकाणी केला जातो. आपल्या भारत या कृषिप्रधान देशात शेती हा उद्योग किती महत्त्वाचा हे सांगायला नको. या शेतीतील महत्त्वाचा घटक म्हणजे बैल. नांगरणी, पेरणी, वखरणीपासून धान्याच्या मळणीपर्यंत सगळीकडे कामात येणारा हरकाम्या म्हणजे बैल. या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा एक मराठी माणसाचा, मराठी शेतकऱ्याचा सण. त्यातही हा सण साऱ्या महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. विदर्भाच्या मध्यप्रदेश आणि तेलंगणा या सीमांवरही हा सण असतो.
 
 
pola festival-Maharashtra ज्यांच्याकडे शेती, बैल नाहीत असे लोक घरोघरी मातीच्या बैलांची पूजा करतात. ज्यांच्याकडे बैल आहेत असे शेतकरी या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती देऊन त्यांचे कोडकौतुक आणि पूजाअर्चा करतात. त्यांना आंघोळ घालून, चारा देऊन नंतर घरी आणतात. नंतर बैलांच्या खांद्याला हळद लावून शेकतात. पाठीवर नक्षीदार झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या, घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे किंवा वा करदोड्याचे तोडे घालतात. त्यांना खायला पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. वर्षभर बैलाचे करणाऱ्या ‘बैलकऱ्या'स नवीन कपडे देण्यात येतात. बैलाच्या वर्षभराच्या ‘ढोर मेहनती'वर प्रकाश टाकून महाराष्ट्रकवी यशवंत यांनी एकीकडे पोळ्याच्या एका दिवसाच्या कौतुकाचा उल्लेख करून बैलांच्या वेदनेकडेही आपल्या शैलीत लक्ष वेधले आहे,pola festival-Maharashtra
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐनेदार
सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे, मरमर ओढायाचे...
वर्तमानातील शेतीचा विचार केल्यास कित्येक शेतांमधून बैलांचा सहभाग आता कालबाह्य झाला आहे. बैलांकडून केली जाणारी सारीच शेतीकामे आता यंत्रसामग्री करू लागली आहे. एक बैलजोडी पोसणे आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. त्यापेक्षा यांत्रिकी शेती स्वस्त पडू लागली आहे. तरीही बैलांशिवाय का असेना, बैलांबद्दल कृतज्ञता म्हणून एक संवेदनशील परंपरा म्हणून सर्वच शेतकरी आजही पोळा साजरा करतातच.
 
 
pola festival-Maharashtra शेतकऱ्यांसोबतच शेतीशी संबंध नसलेले ग्रामीण व विशेषत: लहान शहरांमधील नागरिक आत्मीयतेने पोळा साजरा करतातच. मोठी गावे किंवा लहान शहरांमध्ये सर्व बैल-जोड्या एकत्र आणून पोळा भरविला जातो. त्यांच्यात स्पर्धा केली जाते. उत्कृष्ट बैलजोडीला स्थानिक संस्था बक्षिसे देऊन सन्मानित करतात. हे सारे आजही उत्साहाने केले जाते आणि पुढेही केले जाईल. जी लहान मुले मोठे बैल हाताळू शकत नाहीत त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी ‘तान्हा पोळा' असतो. त्यांचेही एकत्रीकरण, त्यांच्यातही स्पर्धा असते. माती किंवा लाकडाचे बैल घेऊन खऱ्या बैलांप्रमाणेच सारेकाही कोडकौतुक या मुलांचे केले जाते. हा श्रावणाचा शेवटचा दिवस असल्यामुळे श्रावण महिनाभर वेगवेगळी बंधने स्वत:वर जबरदस्ती लादून घेणाऱ्या शौकिनांसाठीही हा ‘सुटके'चा दिवस असतो. pola festival-Maharashtra पोळ्याच्या दुसऱ्या, म्हणजेच करीच्या दिवशी अनेक माणसे बैलाचा भाऊ सांड किंवा वळूसारखे मस्तावलेले आढळून येतात. जशी आता शेतीची यांत्रिकीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे तशीच शेती, शेतकरी यांचीही संपन्न शेतीकडे वाटचाल सुरू व्हावी, मग त्यात बैलांचा सहभागी नसला तरी चालेल. या निमित्ताने एवढेच...!
 
 
९८८१७ १७८२९
Powered By Sangraha 9.0