पारधी पाडयातील राहुलचे यश

राहुल राजपूत यांची महाराष्ट्र पोलीस दलात पदी निवड

    दिनांक :21-Sep-2024
Total Views |
नागपूर,
Maharashtra Police नागपूर जिल्ह्यातील राजुलवाडी (ता .उमरेड) येथील पारधी बेड्यावरच्या तरुण राहुल गंगाधर राजपूत याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून महाराष्ट्र पोलिस दलात पीएसआय पदी निवड झाली. हा नागपूर जिल्ह्यातील फासे पारधी समाजातील बेड्या वरील पहिला पोलिस बनला.
 
rahul 
 
 
गुन्हेगारीचा शिक्का बसलेला फासे पारधी समाज. या समाजातील मुलांना सहजासहजी शिक्षण मिळत नाही. ग्रामीण मातीतील विधवा आईच्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न याच समाजातील राहुलने बघितले.Maharashtra Police  त्याने मुंबई पुणे गाठले. पुण्यातील शैक्षणिक वातावरणच प्रभाव यामुळे जिद्दीने सलग चार वर्षे अभ्यास केला. यामुळेच मेहनतीला फळ आले.
सौजन्य:देवाशिष टोकेकर,संपर्क मित्र