सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे अधिवेशन

22 Sep 2024 14:15:23
नागपूर,
Sahakar Bharti Maharashtra सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाचे चौदावे त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन  साई पालखी निवारा, शिर्डी येथे सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ उदय जोशी, संस्थापक सदस्य व रिझर्व्ह बँक, सेंट्रल बोर्ड संचालक सतिश मराठे, प्रदेश अध्यक्षा  शशि अहिरे, प्रदेश महामंत्री  विवेक जुगादे, अधिवेशन प्रमुख ॲड. रविकाका बोरावके व अधिवेशन सहप्रमुख  अभिनाथ शिंदे यांच्या उपस्थितित झाले.

shridi 
 
 सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने अधिवेशनामध्ये सहकार भारतीचे संस्थापक अध्यक्ष कै. अण्णासाहेब गोडबोले, यांच्या नावाने सहकार क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.Sahakar Bharti Maharashtra या अधिवेशनामध्ये हा मानाचा पुरस्कार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री - महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश  आवाडे यांना प्रदान झाला. यावेळी 'सहकार महर्षी' या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
सौजन्य:अंजली मुळे,संपर्क मित्र  
Powered By Sangraha 9.0