राष्ट्रीय शिवाजी मंडळातर्फे "मस्क-या" गणपती

ओंकार राऊत यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

    दिनांक :22-Sep-2024
Total Views |
नागपूर ,  
Zenda Chowk Mahal Nagpur झेंडा चौक महाल परिसरातील राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भाद्रपद चतुर्थीला शहीद स्मारक येथे मंडळाचे अध्यक्ष ओंकार राऊत यांच्या हस्ते "श्रीं" ची प्रतिष्ठापना करण्यात आली.या संस्थेतर्फे झेंडा चौकात सन १९३६ पासून अव्याहतपणे "मस्क-या" गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. येथे या उत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते हयात असेपर्यंत खंजेरी भजन करीत असत.८८व्या वर्षांत राम औरंगाबादकर यांच्या पौरोहित्यात गणपतीची  प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
  
ramk
 
 या प्रसंगी राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे सचिव गणेश वांढरे, नितीन चौधरी, नरेश आंबेकर, श्याम कापसे,प्रकाश भिसे,शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध धारकर, सचिव शेषराव दुरगकर, व सदस्य प्रकाश भिसे, वसंत माथने, कृष्णा लेदाडे, कृष्णराव चंबोले,प्रकाश बांन्ते  Zenda Chowk Mahal Nagpur व नागद्वार समितीचे सचिव माधव हिरुळकर,विजय लुटे, विजय सोनुले संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते व परिसरातील गणमान्य नागरिक श्रध्दा व उत्साहाने उपस्थित होते.
सौजन्य:विवेक मेंढी,संपर्क मित्र