- ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांचे प्रतिपादन
वर्धा,
निसर्गाची विशेष साथ नसताना देखील काही देशांनी तांत्रिक अविष्कार केले आहेत. दुसर्या महायुद्धात उध्वस्त झाल्यानंतरही जपानने तांत्रिक प्रगतीद्वारे मोठे यश मिळवले. कारण तिथली जनता विलक्षण देशभक्त आहे आणि त्यांना राष्ट्रप्रेम शिकवावे लागत नाही. प्रत्येकात देशभक्ती असेल तर देशाची प्रगती होईल. त्यानंतर देशाची तांत्रिक प्रगती सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार Dr. Uday Nirgudkar डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
स्थानिक अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने आज 22 रोजी शिवशंकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. Dr. Uday Nirgudkar डॉ. निरगुडकर पुढे म्हणाले आपल्या सर्वांना आउटसोर्सिंगची गरज भासली आहे. परंतु, आपली जबाबदारी ही मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगुन तंत्रज्ञान, राष्ट्रीय विकास आणि समाजाच्या उत्तरदायित्वावरही त्यांनी मार्गदर्शन केले. पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी ईश्वर त्यालाच मदत करतो जो स्वतःला मदत करतो असे सांगुन विद्यार्थ्यांनी कर्मशील आणि गतिशील असावे, दृष्टिकोन सकारात्मक असावा, जागरूकता ठेवावी आणि स्वतःचा दीपक बनावे, असे त्यांनी सांगितले. संचालन प्राध्यापक प्रचिती देशपांडे यांनी केले.