‘मुख्यमंत्री माझी शाळा’ अभियानात मोरगाव शाळा जिल्ह्यात तृतीय
23 Sep 2024 19:41:34
अर्जुनी मोरगाव,
'Mukhyamantri Majhi Shala' : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा -2 अंतर्गत येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यात तृतीय स्थान पटकाविले. या अभियानात विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी, ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी आणि नागरिकांनी सहकार्य करून दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शाळा निर्मितीसाठी हातभार लावला. शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये सुद्धा शाळेने अदानी फाऊंडेशनच्या आमची शाळा-सुंदर शाळा उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन तालुका पातळीवर प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले होते. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 1 मध्ये तालुक्यात तृतीय स्थान मिळविले होते हे विशेष. या अभियानाचे जिल्हा पातळीवर मुल्यांकन प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण चव्हाण व पौर्णिमा विश्वकर्मा यांनी केले.
Mukhyamantri Majhi Shala : यावेळी शिक्षणाधिकारी महामुनी यांनी, शालेय परिसर, शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता यावर समाधान व्यक्त केले असून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग घडवून विद्यार्थ्यांना पूरक असे मार्गदर्शन करण्याचे व अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश दिले. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक रेखा गोंडाणे, केंद्रप्रमुख सु. मो. भैसारे, विषय शिक्षक पी. टी. गहाणे, व्ही. बी. भैसारे, जे. एन. ठवकर, वामन घरतकर, आर. पी. उईके, अचला कापगते, रूपाली मेश्राम, ऋषीश्वर मेश्राम यांनी प्रयत्न केले. जिल्हास्तरावर शाळेचे लौकिक केल्यामुळे सरपंच गीता नेवारे, पंचायत समिती सभापती सविता कोडापे, जिल्हा परिषद सदस्या कविता कापगते, उपसरपंच उमाकांत पालिवाल, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोदी, पोलिस पाटील रमेश झोडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोनूताई कराडे, सदस्य मुनेश्वर शहारे, ग्रापं सदस्य विद्या शहारे, पद्मिनी चचाने, मुरारी उईके, देवानंद शहारे, अंगणवाडी सेविका शीला वासनिक आदिंनी शालेय प्रशासनाचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.