अवैध धंद्याचे विरोधात महिला आक्रमक

24 Sep 2024 16:15:50
मानोरा,
Manora Police Station पोलिस स्टेशन हद्दीपासून केवळ सहा कि.मी. अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील माहुली या गावामध्ये मागील अनेक वर्षांपासून बेकायदेशीर वरली, मटका, जुगार, पत्त्यांचा खेळ रंगून स्थानिक अनेक कुटुंबांची राख रांगोळी होत असल्याची फिर्याद असंख्य महिलांनी तंटामुक्ती अध्यक्षांच्या नेतृत्वात स्थानिक पोलिस प्रशासनाला देऊन उपरोक्त बेकायदेशीर काळ्या धंद्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे.
 manora
ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुरू असलेले बेकायदेशीर धंदे बंद करण्यासंदर्भात व अवैध दारू निर्मिती व विक्री ला पायबंध घालण्या संदर्भात ठराव ग्रा. पं. प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. Manora Police Station नवतरुण आणि वयोवृद्ध नागरिक मुक्तहस्ताने मिळणार्‍या मद्याच्या आहारी गेलेली आहेत. पुरुषच नव्हे तर स्थानिक महिला नागरिक सुद्धा अवैध वरली मटका जुगार अशा आहारी गेल्याने गावात तंटे होऊन गावाची शांतता सातत्याने भंग होऊ लागल्याची तक्रार माहुलीचे तंटामुक्ती अध्यक्ष सत्यपाल राठोड यांनी लेखी निवेदनाद्वारा स्थानिक पोलिस स्टेशन मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
 
प्रौढाबरोबरच शाळकरी मुले व तरुण दारू व अवैध धंद्यांच्या नादी लागल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ होऊन गावातील तरुणांचे आयुष्य देशोधडीला लागण्याची भीती लक्षात घेऊन तंटामुक्ती अध्यक्षांच्या नेतृत्वात स्थानिक माता, Manora Police Station भगिनींनी मानोरा पोलिस स्टेशन प्रशासनाला प्रत्यक्ष भेट देऊन माऊली येथे कायदेशीर कारवाई करून उपरोक्त अवैध धंदे आटोयात आणण्याची आग्रही मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0