धडाकेबाज...पुन्हा उभारणार शिवरायांचा पुतळा!

24 Sep 2024 13:25:05
मुंबई,
 
 
Statue-Shivaji Maharaj गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्र शासनाने धडाकेबाज आणि प्रलंबित निर्णय घेण्याची मालिकाच लावली आहे. यात, पुणे विमानतळाचे नाव बदलून संत तुकाराम महाराज विमानतळ (Pune Airport) करण्यासह भगवान परशुराम महामंडळाची स्थापना आणि राजपूत समुदायासाठी महाराणा प्रताप महामंडळाची स्थापना करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. Statue-Shivaji Maharaj साधारण महिन्याभरापूर्वी (Rajkot, Malwan) मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंचीचा ब्रान्झचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसात संतापाची लाट उसळली होती. आता शासनाने पुन्हा शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या दिशेने ठोस पावलं टाकली आहेत.
 
 
 
Statue-Shivaji Maharaj
 
छत्रपतींच्या या पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य केलं होतं. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी २० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. Statue-Shivaji Maharaj राज्यातील विविध वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देण्यात आली आहे. कणकवलीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातून ही निविदा काढली आहे. राज्य शासनाने राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे.
 
 
Statue-Shivaji Maharaj छत्रपतींच्या नव्या पुतळ्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला असून काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत आहे. शिल्पकारांनी ३ ऑक्टोबरपर्यंत महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्याचे ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल सादर करायचे असून ४ ऑक्टोबरला सर्वोत्कृष्ट मॉडेलची निवड होईल. दरम्यान, नवीन पुतळा उभारताना आधी झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न अपेक्षित आहे. Statue-Shivaji Maharaj गडावरील वाऱ्याचा वेग किंवा भुसभुशीत मातीचा विचार करून, नव्या पुतळ्याची उंची आणि बांधकाम केलं जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0