इस्लामपासून दुरावत आहेत मुस्लिम

    दिनांक :25-Sep-2024
Total Views |
विश्लेषण
'X Muslim Movement' मोठ्या आवाजात धारदार, आक्रमक घोषणा देणारे मौलाना आणि मुस्लिम व्होटबँकेचे लांगुलचालन, अनुनय करणारे राजकारणी. दोघांनाही त्यांच्या स्वत:च्या शैलीची सवय झाली आहे आणि स्वत:चेच ढोल वाजविण्यात अर्थात आत्मप्रशंसा करण्यात यांचा हात कुणीच धरू शकत नाही. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील परिवर्तनाची, बदलाची नुसती चर्चा जरी तरी त्याचाही राग येणार्‍या या मुल्ला-मौलवींना आणि राजकारण्यांना त्यांच्या आजूबाजूचे जग कसे बदलते आहे आणि लक्षावधी मुस्लिम इस्लामपासून कसे दूर जात आहेत, इस्लामशी असलेले संबंध तोडत आहेत हे त्यांना बघायचे नाही, याची दखलही घ्यायची नाही. कारण या गोष्टी त्यांना मुळीच सोयीच्या नाहीत. पण त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही. इस्लामचा त्याग लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि हे चलन केवळ पाश्चात्त्य देशांमध्ये वर्षानुवर्षे राहणार्‍या मुस्लिम लोकांमध्येच नाही तर अगदी इस्लामिक देशांमध्येही दिसून येते. पण हा नेमका काय प्रकार आहे? मोजक्या गटांच्या कट्टरतावादी विचारसरणीमुळे जगभरातील इस्लामच्या अनुयायांविषयी मुस्लिमेतर लोकांमध्ये अविश्वास, संशयाची भावना निर्माण झाली आहे. मुस्लिमांमधील काही अतिजहाल गटांच्या वर्तणुकीमुळे व मूलतत्त्ववादी, धर्मांध प्रवृत्तीमुळे मुस्लिमेतर लोकांच्या मनात इस्लामविषयी शंका दाटून आल्या आहेत. एवढेच नव्हे, तर खुद्द मुस्लिम समाजातही इस्लामविषयी शंका निर्माण निर्माण होत आहे.
 
 
Muslim-3
 
'X Muslim Movement' ‘एक्स मुस्लिम चळवळ’ ही एक लाट आहे ज्याचा आकार हळूहळू वाढत आहे. या चळवळीत जगातील कानाकोपर्‍यातील मुस्लिम लोक सामील होत आहेत. पाश्चिमात्य देशांमधील तथाकथित आधुनिक समाजांप्रमाणेच देशांमध्ये देखील या ‘एक्स मुस्लिम’ चळवळीने वेग घेतला आहे आणि इस्लामशी नाते तोडणारे लोक अनेक धोके असतानाही सार्वजनिकपणे, जाहीरपणे उच्चार करीत इस्लामचा त्याग करीत आहेत. ही चळवळ अशा समाजांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरते जिथे श्रद्धा, विश्वास बदलण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. आणि जे असे करतात त्यांना सामाजिक बहिष्काराला तसेच कायदेशीर सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे त्यांचा जीव धोक्यात असतो. इथे दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात - पहिला, प्रश्न हा की मुस्लिमांच्या इस्लाम सोडण्याच्या चळवळीचा (एक्स मुस्लिम मूव्हमेंट) व्याप किती आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे हे असे का होत आहे?
 
 
घटती श्रद्धा, वाढता संशय
‘डेमोग्राफिक ट्रेंड’ अर्थात लोकसंख्याशास्त्रीय कल प्रदान ‘प्यू रिसर्च सेंटर’चे म्हणणे आहे की दरवर्षी किती लोक इस्लाम सोडत आहेत याची अचूक संख्या सांगणे कठीण आहे. कारण धर्म-पंथ सोडण्याची अनेक कारणे आहेत, ज्याची नेमकी माहिती अनेकदा समोर येत नाही. तरीही, प्यू रिसर्च सेंटरने काही अंदाज आणि आकडेवारी सादर केली आहे. प्यूच्या २०२० च्या अहवालानुसार, इस्लाम सोडणार्‍यांमध्ये पहिले देश होते - फ्रान्स (१८ टक्के), अमेरिका (१५ टक्के) आणि ब्रिटन (१२ टक्के). अहवालानुसार, ५५ टक्के लोकांनी इस्लाम सोडण्यामागे श्रद्धा गमावल्याचे कारण सांगितले, तर २१ टक्के लोकांनी धार्मिक संस्थांबद्दलचा भ्रमनिरास, तर १५ टक्के लोकांनी यासाठी वैयक्तिक कारणे नमूद केली.
 
 
'X Muslim Movement' ‘प्यू’ च्या २०१९ च्या अहवालात असे सांगण्यात आले की, अमेरिकेतील १३ लाख मुसलमानांनी इस्लाम सोडला आहे. प्यूच्या २०१७ च्या अहवालानुसार, अमेरिकेत दरवर्षी इस्लाम सोडणार्‍यांची संख्या जवळपास एक लाख होती, तर फ्रान्समध्ये अशा लोकांची संख्या १५ हजार होती. तर दुसरीकडे गॅलपच्या २०१९ च्या अहवालानुसार, २३ टक्के अमेरिकन मुस्लिमांनी सांगितले की त्यांना इस्लामबद्दल शंका, संशय आहे, तर १२ टक्के लोकांनी स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेतले. इस्लाम सोडणार्‍यांपैकी ४४ टक्के लोकांनी आमचा इस्लामवर विश्वास राहिला नसल्याचे सांगितले, तर २६ टक्के लोकांनी धार्मिक संस्थांबद्दलचा भ्रमनिरास हे कारण सांगितले आणि २१ टक्के लोकांनी वैयक्तिक कारणे उद्धृत केली.
 
 
इस्लाम सोडणार्‍यांपैकी बहुतांश सुशिक्षित, शिकले सवरलेले तरुण होते ज्यांचा जन्म अमेरिकेत झाला होता. २०२० मध्ये अमेरिकेत धार्मिक जनगणनेनुसार तेथील मुस्लिम लोकसंख्या १.३४ टक्के होती, म्हणजे सुमारे ४४ लाख. आता लोकसंख्येचा हा आकार लक्षात घेऊन, तिथे इस्लाम सोडणार्‍यांची संख्या किती प्रचंड वेगाने वाढत आहे, याचा विचार करा.
 
 
त्याचप्रमाणे, २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार ब्रिटनमध्ये दरवर्षी जवळपास एक लाख मुस्लिम इस्लाम सोडत आहेत. २०१९ च्या जनगणनेत, आणि वेल्समधील ६१,००० लोकांनी स्वत:ची ओळख ‘एक्स-मुस्लिम’ अशी सांगितली आणि ४३ टक्के लोकांनी ‘इस्लामवरील श्रद्धा-विश्वास याचा अभाव’, २४ टक्के लोकांनी ‘धार्मिक संस्थांबद्दल भ्रमनिरास’ आणि २१ टक्के लोकांनी ‘व्यक्तिगत’ अशी इस्लाम सोडण्याची विविध कारणे सांगितली. त्याचप्रमाणे, हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या जर्नल ऑफ कंटेम्पररी रिलिजन (२०१८) ने इस्लाम सोडणार्‍यांना लोकांना स्थान मिळवून देणार्‍या मंचांचा अभ्यास केला आणि लोकांची इस्लामवरील श्रद्धा कमी होणे, धार्मिक संस्थांकडून झालेला भ्रमनिरास आणि वैयक्तिक कारणे, यामुळेच लोक मोठ्या प्रमाणात इस्लामचा त्याग करीत असल्याचा निष्कर्ष काढला.
 
 
'X Muslim Movement' ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल युनिव्हर्सिटीने २०१९ मध्ये ५५ माजी मुस्लिमांची (एक्स-मुस्लिम) मुलाखत घेतली. त्यांना इस्लाम सोडण्याचे कारण विचारले असता त्यांनी श्रद्धेचा अभाव, धार्मिक संस्थांकडून भ्रमनिरास वैयक्तिक कारणे नमूद केली. इस्लाम सोडल्यामुळे सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागत असल्याचे त्यापैकी अनेकांनी सांगितले.
 
 
भारताबाबतचा प्यूचा २०२१ चा अहवाल सांगतो की, येथील ६ टक्के मुस्लिम ‘अल्ला’ वर विश्वास ठेवत नाहीत. देशातील मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. याचा विचार करता भारतात सुमारे १.२ कोटी ‘एक्स मुस्लिम’ आहेत असे साहिल (माजी मुस्लिम) यांनी केले.
 
 
मुस्लिम देशांमध्येही भ्रमनिरास
दोन वर्षांपूर्वी इराणमध्ये इतके मोठे आंदोलन झाले होते की, केवळ इराणच पेटला असे नाही, तर जगातील अनेक देशांना या आंदोलनाची झळ बसली होती. असे का घडले? इराणचा एक देशांतर्गत मुद्दा सीमा ओलांडून इतर देशांपर्यंत का पोहोचला? या बाहेरच्या देशातील मुस्लिम नागरिकांनाही लोकांची वेदना आपली स्वत:ची आहे असे का वाटू लागले?
 
 
'X Muslim Movement' हा सारा गोंधळ १३ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू झाला. हिजाबच्या नियमांचे कथित उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली महसा अमिनी हिला पोलिसांनी अटक केली होती. तिला प्रचंड मारहाण करण्यात आली. क्रूर छळ करण्यात आला. अखेर १६ सप्टेंबर २०२२ रोजी अमिनीचा मृत्यू झाला. इराणच्या प्रांतातील साकेज येथे राहणारी २२ वर्षीय अमिनी शिक्षण घेत होती. ती आपल्या भावासोबत तेहरान येथे गेली असता पोलिसांनी तिला अटक केली. १६ सप्टेंबर रोजी महसाच्या भयानक मृत्यूची बातमी जेव्हा साकेझमध्ये पोहोचली तेव्हा दुसर्‍याच दिवशी लोक प्रचंड संख्येत रस्त्यावर उतरले.
 
 
१८ सप्टेंबर रोजी इराणची राजधानी तेहरानसह देशातील अनेक भागांमध्ये जबरदस्त सुरू झाली. सुरुवातीला या आंदोलनात केवळ विद्यार्थी सहभागी झाले होते. परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने बळजबरीने हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला, ते पाहून लवकरच सर्वसामान्य लोकही त्यात सामील झाले. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई केली. अनेक ठिकाणी गोळीबार झाला. ऑक्टोबर अखेरीस पोलिसांच्या कारवाईमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २०० वर गेली डिसेंबरपर्यंत हा आकडा ५५० वर पोहोचला. या आंदोलनाबद्दल दोन गोष्टी काळजीपूर्वक पाहिल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडणार्‍यांचे प्रमाण सातत्याने वाढत असतानाही तीन महिने आंदोलन सुरूच राहिले आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहभागी असलेल्या लोकांनी अतिशय तीव्रतेने धर्मांधता व कट्टरतेला विरोध केला.
 
 
'X Muslim Movement' आस्था व श्रद्धा हे मुद्दे लक्षात इस्लाम हा असा ‘वन वे’ आहे ज्यामध्ये यू-टर्नची कुठलीही तरतूद नाही. या एकतर्फी मार्गातून लोक येऊ शकतात. मात्र, बाहेर जाऊ शकत नाहीत आणि जर कोणी इस्लाम सोडला तर त्याला फाशीची शिक्षाही ठोठावली जाऊ शकते. जगात असे ४९ मुस्लिम बहुल देश आहेत, जिथे मुसलमानांची लोकसंख्या ५० टक्के किंवा त्याहून अधिक यापैकी २७ देशांमध्ये इस्लामिक राज्य आहे. सात देशांनी स्वत:ला ‘इस्लामी देश’ घोषित केले आहे. हे आहेत अफगाणिस्तान, इराण, मॉरिटानिया (आफ्रिका खंडातील), पाकिस्तान, सौदी अरब, सोमालिया आणि येमेन. इस्लामिक देश असण्याचा अर्थ असा आहे की या देशांमध्ये इस्लाम हा केवळ राजधर्मच नाही, तर सरकारच्या कामकाजापासून तर कायदा आणि सुव्यवस्थेपर्यंत सर्व इस्लामच्या शिकवणुकीवर आधारित असतात. शरिया कायद्यानुसार इस्लाम सोडणार्‍यांना फाशीची शिक्षा होऊ शकते आणि अशाप्रकारची उदाहरणे अनेक देशांमध्ये पाहायला मिळतात.
 
- सौदी अरब : २०१४ मध्ये सौदी अरबच्या एका नागरिकाला इस्लाम सोडल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- इराण : २०१३ मध्ये एका इराणी नागरिकाला इस्लाम सोडल्याबद्दल फाशीची शिक्षा देण्यात होती.
- सोमालिया : २०१७ मध्ये एका सोमाली नागरिकाला इस्लाम सोडल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- अफगाणिस्तान : २०१८ मध्ये एका अफगाण नागरिकाला इस्लाम सोडल्याबद्दल मृत्यूदंड देण्यात आला होता.
 
या उदाहरणांनंतर पुन्हा एकदा इराणच्या महसा अमिनी प्रकरणाकडे पहा. तेथे मुद्दा इस्लाम सोडण्याचा नव्हता, तर कठोर शरिया कायद्यांविषयी लोकांमध्ये तीव्र संतापाचा होता. इस्लामविषयी भ्रमनिरास होण्याचा हा प्रारंभिक टप्पा आहे. जगभरातील मुस्लिमांनी इस्लाम सोडण्यासाठी, इराणमधील महसा अमिनीच्या कोठडीतील मृत्यूनंतर लोकांमध्ये निर्माण झालेल्या संतापाच्या उद्रेकाकडे गांभीर्याने पाहण्याची-समजून घेण्याची गरज आहे. इराणमधील हिजाब कायद्यानुसार, ज्याला ‘इस्लामिक ड्रेस कोड’ म्हणूनही ओळखले जाते, महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब आणि मोकळे कपडे घालणे आवश्यक आहे. कायदा इराणमध्ये १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर लागू करण्यात आला व हा इस्लामिक कायद्याच्या (शरिया) व्याख्यावर आधारित आहे. एकूणच सर्व परिस्थितीचा विचार करता इस्लाम सोडणार्‍या मुस्लिमांची वाढती संख्या दर्शवते की ही प्रवृत्ती अपवाद किंवा तात्पुरती नाही. त्या धर्मातील लोक अतिशय गांभीर्याने व विचारपूर्वक हा निर्णय घेत आहेत. धर्मत्यागाची ही प्रक्रिया राहील, अशीच सध्याची परिस्थिती आहे. 
 
 
'X Muslim Movement' जगभरातील मुस्लिमांचा इस्लामबद्दल अधिकाधिक भ्रमनिरास होत आहे. विविध सोशल मीडिया मंच प्लॅटफॉर्म आणि प्यू रिसर्च सेंटर सारख्या प्रतिष्ठित संस्था याला दुजोरा देत आहेत. इस्लामची शिकवण व आचार-विचार यांचा मनमानीपणे वापर करणार्‍या मुल्ला-मौलवींनी देखील धार्मिक लोकांना इस्लामपासून दूर ढकलले. याचा परिणाम म्हणजे इस्लामचा त्याग संख्या सातत्याने वाढत आहे.
 
 
‘ऑसम विदाऊट अल्ला’ अभियान
२०१९ सालची गोष्ट. आजच्याप्रमाणेच तेव्हाही ट्विटरचा बोलबाला होताच. अचानक ट्विटरवर #AwesomeWithoutAllah हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागतो आणि मग ‘आम्हाला इस्लाम मान्य नाही’ ही अनेकांच्या मनात दडलेली गोष्ट समोर येते आणि काही वेळातच जगाच्या कानाकोपर्‍यातील लोक या चळवळीत सामील होतात आणि ‘आम्ही त्याग केला आहे’ असे ते घोषित करतात. मग ‘कोणासोबत काय घडले व आपण इस्लाम का सोडला’ याबद्दल लोक आपले अनुभव शेअर करू लागतात.
 
 
'X Muslim Movement' ‘ऑसम विदाऊट अल्ला’ ही एक चळवळ आहे जी उत्तर अमेरिकेतील ‘एक्स मुस्लिम’ चालवत आहेत. इस्लाम सोडलेल्या लोकांना आपले अनुभव सांगण्यासाठी यामाध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. इस्लामशिवाय देखील मुस्लिम व्यक्ती पूर्ण आणि आनंदी जीवन जगू शकतेे, या विचाराला चालना देणे हा या चळवळीचा उद्देश आहे. ही मोहीम प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून #AwesomeWithoutAllah हा हॅशटॅग वापरून चालवली जाते. यामध्ये लोक त्यांचे अनुभव शेअर करतात ज्यात अनेक प्रकरणे ‘इस्लाम सोडल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा किंवा छळाचा सामना लागला’ याच्याशी संबंधित आहेत. ही मोहीम ‘एक्स मुस्लिम ऑफ नॉर्थ अमेरिका’ (एक्सएमएनए) नामक एक स्वयंसेवी संस्था राबवत आहे आणि अमेरिकेत वाढणार्‍या दर चार मुस्लिमांपैकी एकाने इस्लाम सोडला असल्याचे असे या स्वयंसेवी संस्थेचे म्हणणे आहे. इस्लाम सोडणार्‍या लोकांना भेदभावाची वागणूक मिळू नये, हा देखील या अभियानाचा उद्देश आहे. हा उपक्रम मध्ये मानवाधिकार कार्यकर्ते मोहम्मद सईद यांनी सुरू केला होता.
 
 
‘एक्स मुस्लिम’ म्हणतात...
लोक सहजासहजी आपल्या धर्माचा-श्रद्धांचा त्याग करीत नाहीत. समजा त्यांना त्यांच्या धर्मातील काही गोष्टी आवडत नसल्या तरीही ते त्यांच्याशी जुळवून घेतात. मात्र यानंतरही जर मोठ्या संख्येने लोक आपला धर्म बदलत असतील, तर तो एक गंभीर विषय ठरतो.
- एक्स-मुस्लिम गट
इस्लाममधील मानवाधिकारांचे उल्लंघन ही एक संरचित आणि संस्थागत समस्या आहे
(सोमालियामध्ये जन्मलेली आयशा १९९७ पासून नेदरलँडची नागरिक आहे.)
- आयेशा हिरसी अली
०००
मी इस्लामिक शाळेत शिकले. पण जेव्हा मी विज्ञान आणि तर्कशुद्धतेबद्दल जाणून घेऊ लागले, या विषयांचा अभ्यास करू लागले तेव्हा मला समजले की इस्लामिक शिक्षण नाही.
(सोमालियात जन्मलेली लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्ती)
- आयेशा अहमद
०००
मी यासाठी इस्लाम सोडला कारण इस्लामच्या शिकवणुकीमध्ये आढळणारे विरोधाभास आणि अमानुषतेबद्दल मी खोटे बोलू शकत नाही.
- इमरान फिसारत
पाकिस्तानी वंशाचे लेखक
मला असे वाटते की, हिजाब आणि बुरखा घातल्याने महिलांच्या स्वातंत्र्याला बाधा येते. ते त्यांना एक व्यक्ती नव्हे तर एक वस्तू म्हणून पाहते.
- अब्दुल्ला अहमद अनस
मानवाधिकार कार्यकर्ते
०००
नमाज ही एक अशी प्रथा आहे जी मुसलमानांच्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवते आणि त्यांना महिलांच्या अधिकारांबद्दल असंवेदनशील बनवते.
- वफा सुल्तान
लेखिका आणि मानवाधिकार
कार्यकर्ती
मुल्ला, मौलवी आणि मौलाना लोकांना त्यांच्या आजूबाजूच्या जगापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना जखडून ठेवण्यासाठी धर्माचा वापर करतात.
- ताहिर गोरा
पाकिस्तानी वंशाचे लेखक
०००
इस्लामची शिकवण आणि विज्ञान हे एकमेकांच्या विरुद्ध आहे, असा माझा अनुभव आहे. विकासवाद, उत्क्रांती आणि खगोलशास्त्र शिकल्यानंतर मला समजले की इस्लामची शिकवण कालबाह्य आणि अतार्किक आहेत.
- अली अहमद
पाकिस्तानी वंशाचे लेखक
 
(पांचजन्यवरून साभार)