नागपूर,
Arjuna Celebration Hall खामला परिसरातील अर्जुना सेलिब्रेशन हॉलचे प्रबंधक हेमंत नानिवडेकर आणि सुहासिनी नानिवडेकर यांच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचा सामुहिक पारायण सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी ३०० पारायणकर्त्यांनी पारायणाची सेवा गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केली. या सोहळ्या दरम्यान भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. पारायण संपल्यानंतर श्री तीर्थक्षेत्र शेगांव प्रमाणे महाआरतीचे आयोजन केले होते. Arjuna Celebration Hall महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री गजानन महाराज उपासना केंद्र नागपूरचे जयंत वेलणकर यांनी प्रास्ताविक करून भक्तांना मार्गदर्शन केले. शेवटी चंद्रशेखर छत्रपाल यांनी आपल्या चमूसह महाआरतीने सांगता केली. याप्रसंगी सातशे भक्तांसह महाप्रसादाचा लाभ घेतला.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र