- निर्णय लवकरच
छ. संभाजीनगर,
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची येथे भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी रात्री उशिरा या बैठकीत नेमके काय झाले, याचे तपशील बाहेर येऊ शकले नाहीत. मात्र, शाह यांच्यासोबत जागावाटपावर सकारात्मक चर्चा झाली. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले.
बैठकीनंतर पत्रकारांनी शिंदे यांना जागावाटपाबाबत प्रश्न विचारले. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाली. लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. चर्चा समन्वयातून सकारात्मकरीत्या पुढे जात आहेत, असे त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. अमित मंगळवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सत्तेतील महायुतीतील भागीदार शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या जागावाटपावर चर्चा करीत आहेत. मंगळवारी रात्री अमित शाह, भूपेंद्र यादव, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपावर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलही सहभागी झाले. ही बैठक रात्री साडेबारा वाजेपर्यंत सुरू होती.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पहाटे पाऊण वाजता हॉटेलबाहेर पडले. मात्र, कोणत्याही नेत्याने हॉटेलमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला नाही. ही बैठक सकारात्मक झाली आणि लवकरच निर्णय घेतला जाईल. चर्चा अत्यंत सकारात्मक आणि योग्य दिशेने जात आहे, असे नंतर CM Eknath Shinde शिंदे सांगितले.