नागपूर
Nagpur Mahanagar Palika शहरात चिकन गुनिया डेंग्यू सारख्या रोगांची साथ वाढत आहे. अशावेळी सर्वत्र स्वछता राखणे जरुरी असतांना,बेसा ते पिपळा रोड वर मांस विक्रेते वाटेल तेथे आपली दुकाने थाटून रस्त्यांच्या कडेला बसतात.मांस कापतात.मच्छी व मास विक्री करित असतात.गलिच्छ वास येतं असतो. परिसरात जनावरे व डुक्कर सुध्दा वाढलेले आहेत. नागरिकांना रस्त्याने जाणे येणे कठीण झालेले आहे.
या आधी बेसा नाल्या जवळील अनधिकृत मास विक्रेत्यांना हटविण्यात आले होते. परंतू परत थाटात दुकानें सुरु केलेली आहेत.
ह्यां लोकांना एक विशिष्ट ठिकाणी झोन करुन जागा द्यावी Nagpur Mahanagar Palika,जेणे करून जाणाऱ्या येणाऱ्या नागरीकांना त्याचा त्रास होणार नाही.प्रशासनाने अवैध मास विक्रेत्यांवर कडक करावी अशी परिसरातील लोकांची मागणी आहे.
सौजन्य:राहुल बनसोड,संपर्क मित्र